Join us
Daily Top 2Weekly Top 5

रवी जाधव का म्हणतोय 'जवाब दो'?वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 15:06 IST

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता रवी जाधव सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात.आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासोबतच विविध विषयांवरील आपली मतं ते ...

प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता रवी जाधव सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात.आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासोबतच विविध विषयांवरील आपली मतं ते सोशल मीडियावर व्यक्त करत असतात. ते जे काही पोस्ट करतात यावर नेटिझन्स आणि त्यांच्या फॅन्सचं लक्ष असते. नुकतंच सोशल मीडियावर रवी जाधवने पोस्ट केलेला फोटो त्याच्या फॅन्स आणि नेटिझन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. अंनिसचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची छबी असलेला फोटो रवी जाधव यांनी पोस्ट केला आहे. या फोटोवर 'हू किल्ड दाभोलकर ? जवाब दो' असं लिहलेले आहे. रवी जाधव यांनी पोस्ट केलेला फोटो सध्या चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरला आहे. या पोस्टरच्या माध्यमातून रवी जाधव यांनी त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा तर केली नाही ना? अशा चर्चाही सुरु झाल्या आहेत.अनेक फॅन्स रवी जाधव यांच्याकडे कमेंट्सच्या माध्यमातून या फोटोबाबत विचारणा करुन हा आगामी सिनेमा तर नाही ना अशी विचारणा करत आहेत. रवी जाधव यांच्या एका फॅनने त्यांना कमेंटद्वारे विचारले आहे की, “सर हा तुमचा आगामी सिनेमा असेल तर मला नक्कीच तो पाहायला आवडेल. तुम्ही एक प्रतिभाशाली दिग्दर्शक आणि अभिनेते आहात. 'कच्चा लिंबू' हा तुमचा सिनेमा उत्कृष्ट होता. यातील तुमची भूमिका खरंच कौतुकास्पद होती. खरंच तुम्हाला सलाम आणि शुभेच्छा”. या आणि अशा कितीतरी कमेंट्सच्या माध्यमातून सध्या रवी जाधव यांना या फोटोबाबत विचारणा होत आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 ऑगस्टला चार वर्ष पूर्ण झाली आहेत. चार वर्षांनंतरही डॉ. दाभोलकर यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. याचा निषेध करण्यासाठी अंनिसच्या वतीने राज्यभर 'जवाब दो' हे आंदोलन करुन सरकारला सवाल उपस्थित करण्यात आला होता. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा समाजातील प्रत्येक घटकाने निषेध केला होता.यांत कलाकार आणि चित्रपटसृष्टीतील मंडळी मागे नव्हती.रवी जाधव यांनीही या हत्येचा निषेध केला होता. त्यामुळे आता त्यांनी पोस्ट केलेला फोटो हा अंनिसच्या आंदोलनाला पाठिंबा होता की त्यावर ते आगामी काळात सिनेमा बनवणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.