Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rakshabandhan Special : मराठी चित्रपटसृष्टीतील ही आहेत सेलिब्रेटी भांवडं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 17:15 IST

आज सगळीकडे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.

आज सगळीकडे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारदेखील रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार हे त्यांचे रिअल लाइफमध्ये बहिण भाऊसुद्धा आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात.

सोनाली कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी हे दोघे सख्खे भाऊ बहिणी आहेत. हे भाऊ-बहिण कॉलेजपासून अभिनय करत आहेत. सोनाली कुलकर्णीने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. तर संदेश कुलकर्णीने मालिका, नाटक आणि चित्रपटात काम केले आहे.  अभिनया सोबतच त्याने अनेक नाटकांचे संवाद लेखन केले आहे.

गौतमी देशपांडे- मृण्मयी देशपांडे

मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. मृण्मयीपाठोपाठ गौतमीने सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. गौतमीची सारे तुझ्याचसाठी ही तिची पहिली मालिका आहे. ही एक उत्तम गायिका सुद्धा आहे. तर मृण्मयी कथ्थक नृत्य प्रकारात पारंगत आहे.

अभिषेक देशमुख-अमृता देशमुख

आई कुठे काय करते मालिकेत यशची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक देशमुख आणि फ्रेशर्स मालिकेत परीची भूमिकेत दिसलेली अभिनेत्री अमृता देशमुख खऱ्या आयुष्यात सख्खे भाऊ-बहिणी आहेत. हे दोघेही मुळचे पुण्याचे असून त्यांचे शिक्षण देखील पुण्यातच झाले आहे. अमृता सध्या ‘मी तुझीच रे’ मालिकेत काम करते आहे.

पूर्णिमा तळवलकर-पल्लवी वैद्य

पूर्णिमा तळवलकर-पल्लवी वैद्य या दोघी बहिणींची जोडी सुद्धा खूप लोकप्रिय ठरली. या दोघीही सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे माहेरचे आडनाव भावे आहे. पूर्णिमा हिने दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर यांच्या पुतण्याशी लग्न केले. तर पल्लवीने दिग्दर्शक केदार वैद्यसोबत विवाह केला. पूर्णिमा तळवळकर सध्या रंग माझा वेगळा मालिकेत काम करत आहे. पल्लवी झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत दिसली होती.

अभिनय बेर्डे - स्वानंदी बेर्डे

अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुले अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे दोघे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयने पदार्पण केले. स्वानंदी बेर्डे लवकरच मराठी चित्रपटात झळकणार आहे.

मृण्मयी गोडबोले-सह्रद गोडबोले 

मृण्मयी गोडबोले-सह्रद गोडबोले ही बहिण-भावांची जोडी सुद्धा मराठी फिल्म इंडस्ट्रीत बरीच चर्चेत येत असते. मृण्मयीने अनेक नाटक आणि सिनेमांमध्ये काम केले आबे. मात्र, ‘अग्निहोत्र’ या मालिकेत तिने साकारलेली भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिचा भाऊ सह्रदने सुद्धा अभिनयासोबत निर्मिती क्षेत्रात काम केले.

भार्गवी चिरमुले-चैत्राली गुप्ते

 भार्गवी चिरमुले-चैत्राली गुप्ते या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. भार्गवीने मोलकरीण आणि वहिनीसाहेब या मालिकेत काम केले आहे. तर चैत्राली सध्या ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेत काम करते आहे.

टॅग्स :सोनाली कुलकर्णीस्वानंदी बेर्डेअभिनय बेर्डे