राकेश बापटला बॉलिवूडचे चीअर अप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 21:21 IST
राकेश बापट सध्या आनंदाने वेडा झालाय. म्हणजे, बातमीही तशीच आहे. ‘वृंदावन’ या मराठमोळ्या सिनेमातील राकेशच्या अॅक्शनच्या सगळेच प्रेमात ...
राकेश बापटला बॉलिवूडचे चीअर अप
राकेश बापट सध्या आनंदाने वेडा झालाय. म्हणजे, बातमीही तशीच आहे. ‘वृंदावन’ या मराठमोळ्या सिनेमातील राकेशच्या अॅक्शनच्या सगळेच प्रेमात पडले आहेत. आता तुम्ही म्हणाल त्यात काय नवे, तर चक्क बॉलिवूड दिग्गजांनी ‘वृंदावन’मधील राकेशच्या अॅक्शन दृश्यांची प्रशंसा केली आहे. आधी सलमान खानने राकेशला चीअर अप केले होते. आता किेंग खान शाहरूख खाननेही त्याला चीअर अप केले आहे. वरूण धवन, जॉन अब्राहम यांनीही ‘वृंदावन’ राकेशच्या भूमिकेचे, त्याच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले आहे.‘वृंदावन’ हा अॅक्शन, ड्रामा आणि एंटरटेनमेंट असा सगळा मसाला असलेला चित्रपट आहे. यात राकेशने एकशे एक फाईट सिक्वेन्स दिले आहेत. येत्या गुढीपाडव्याला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय...तेव्हा बघायला हवाच...हो ना!