Join us
Daily Top 2Weekly Top 5

रितेश देशमुखने करून दाखवलं! 'राजा शिवाजी'ची १०० कोटींकडे वाटचाल, दुसऱ्या आठवड्याचं कलेक्शन समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 13:36 IST

'राजा शिवाजी' सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही उत्कृष्ट गती कायम ठेवत एकूण कमाई ७५.१० कोटींइतकी केली आहे.

Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख दिग्दर्शित 'राजा शिवाजी' चित्रपट पहिल्या दिवसपासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची दुसऱ्या आठवड्यातही यशस्वी घोडदौड सुरूच आहे. 'राजा शिवाजी' सिनेमाने दुसऱ्या आठवड्यातही उत्कृष्ट गती कायम ठेवत एकूण कमाई ७५.१० कोटींइतकी केली आहे. विक्रमी ओपनिंगसह इतिहास रचल्यानंतर आणि पहिल्या आठवड्यात आपली पकड कायम ठेवल्यानंतर, या ऐतिहासिक महाकाव्याच्या कमाईत शनिवार आणि रविवारी जोरदार वाढ दिसून आली.

पहिला आठवड्यात या सिनेमाने एकूण ५७.७० कोटींचा गल्ला जमवला होता. तर दुसऱ्या शुक्रवारी ३.५० कोटींचा बिजनेस 'राजा शिवाजी'ने केला. वीकेंडला पुन्हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर उसळी घेतल्याचं दिसलं. शनिवारी ६.३० कोटी आणि रविवारी ७.६० कोटींचा गल्ला जमवत वीकेंडला १३.९० कोटी 'राजा शिवाजी'ने कमावले. आत्तापर्यंत 'राजा शिवाजी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर एकूण ७५.१० कोटींचा बिजनेस केला असून सिनेमाची १०० कोटींकडे वाटचाल सुरू झाली आहे. 


राजा शिवाजीचे विक्रम:
* मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग डे
* मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक ओपनिंग वीकेंड
* मराठी चित्रपटासाठी सर्वाधिक एका दिवसाची कमाई
* मराठी चित्रपटासाठी पहिल्या आठवड्यातील सर्वाधिक कमाई

दरम्यान, 'राजा शिवाजी' सिनेमात रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर जिनिलीया राणी सईबाईंच्या भूमिकेत आहे. संजय दत्त अफजलखान, विद्या बालन बडी बेगम, भाग्यश्री राजमाता जिजाऊ, अभिषेक बच्चन संभाजीराजे शहाजी भोसले यांच्या भूमिकेत आहेत. तर बोमन इराणी, अमोल गुप्ते, फरदीन खान, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' nearing 100 crore mark!

Web Summary : Riteish Deshmukh's 'Raja Shivaji' continues box office success, earning ₹75.10 crore in two weeks. The historical epic saw increased weekend earnings, heading towards ₹100 crore. The film stars Riteish Deshmukh as Shivaji Maharaj and Genelia D'Souza as Saibai.
टॅग्स :राजा शिवाजी चित्रपटरितेश देशमुखजेनेलिया डिसूजाबॉक्स ऑफिस कलेक्शन