Join us
Daily Top 2Weekly Top 5

पुष्कर जोगच्या मुलीचा क्यूट फोटो त्याच्या पत्नीने केला सोशल मीडियावर शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 11:43 IST

पुष्कर जोगची पत्नी जास्मिन ब्राह्मभट्टने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांची ...

पुष्कर जोगची पत्नी जास्मिन ब्राह्मभट्टने तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर नुकताच त्यांच्या मुलीचा पहिला फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांची मुलगी खूपच क्यूट दिसत असून पुष्कर आणि जास्मिन तिला किस करताना दिसत आहेत. पुष्कर आणि जास्मिन यांनी त्यांच्या मुलीचे नुकतेच बारसे केले आहे. या फोटोसोबतच लिहिलेल्या कॅप्शनमध्ये जास्मिनने त्यांच्या मुलीचे नाव देखील पुष्करच्या फॅन्सना सांगितले आहे. त्यांच्या मुलीचे नाव खूपच छान असून या नावाचा अर्थ देखील जास्मिनने सांगितला आहे. त्यांनी मुलीचे नाव फेलिशा असे ठेवले असून हा लॅटिन अमेरिकन शब्द आहे. याचा अर्थ तुमच्या आयुष्यात आनंद आणणारी असा होतो असे तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. पुष्करनेच त्याला मुलगी झाली असल्याची गुड न्यूज सोशल मीडियाद्वारे त्याच्या चाहत्यांना दिली होती. १९ डिसेंबर २०१७ ला त्याच्या पत्नीने एका क्यूट बाळाला जन्म दिला. पुष्करने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. जास्मिन गरोदर असताना जास्मिन आणि पुष्करने छानसे फोटो शूट केले होते. त्या फोटो शूट मधील एका फोटोवर त्याने लिहिले होते की, आमच्या कुटुंबात एका नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. एक चिमुकली आमच्या आयुष्यात आली आहे. जास्मिन ही एक हवाईसुंदरी आहे. एका विमान प्रवासादरम्यानच पुष्कर आणि जास्मिनच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली होती. त्यांनी काहीच महिन्यांच्या अफेअरनंतर लग्न केले. पुष्कर आणि जास्मिनने २६ नोव्हेंबर २०१४ला पुण्यात लग्न केले होते. अगदी नेमके पाहुणे आणि नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता.पुष्कर जोगने बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. सून लाडकी सासरची, रावसाहेब, साखरपुडा यांसारख्या मराठी चित्रपटात त्याने बालकलाकाराची भूमिका साकारली. त्यानंतर जबरदस्त, मिशन पॉसिबल, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या चित्रपटांमध्ये तो नायकाच्या भूमिकेत झळकला. त्याने वचन दिले तू मला, धूमशान यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केले आहे. पुष्करने काही हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. Also Read : पुष्करच्या आयुष्यातला आनंदाचा 'तो' क्षण कोणता?