अभिनेत्रींच्या अभिनयाचे, हास्याचे आणि नृत्याचे अनेक फॅन्स असतात. पण जेव्हा अभिनेत्री क्रिकेट लीगमध्ये उतरतात तेव्हा त्यांचा चाहता वर्ग अजून वाढतो. ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ हा क्रिकेटचा सामना लवकरच पुण्यामध्ये रंगणार आहे. या सामन्यामध्ये जसे पुण्यातील अनेक अनेक अभिनेत्यांनी सहभाग घेतला आहे तसेच पुण्यातील अभिनेत्रींनी पण यामध्ये सहभाग घेतला आहे.
पुण्यात होणा-या कलाकार बॉक्स क्रिकेट लीग मध्ये सहभागी झालेल्या पुणेरी अभिनेत्री – परी तेलंग, दिप्ती देवी, तेजस्विनी लोणारी, मधुरा देशपांडे, सीमा कदम, रुचिका पाटील आदी.
हा क्रिकेचा सामना जुलैच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे. क्रिडा क्षेत्राविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहित करण्यासाठी ‘कलाकार बॉक्स क्रिकेट लीग २०१६’ चे आयोजन करण्यात आले आहे.