Join us

सुबोध आणि क्रांतीचे प्रमोशनल साँग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 14:45 IST

 चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्यासाठी आता, चित्रपटातील कलाकारदेखी जोरदार प्रयत्न करू लागले आहे. चित्रपटाचा प्रमोशन फंडा म्हणून आता, कांचन अधिकारी दिग्दर्शित ...

 चित्रपट प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्यासाठी आता, चित्रपटातील कलाकारदेखी जोरदार प्रयत्न करू लागले आहे. चित्रपटाचा प्रमोशन फंडा म्हणून आता, कांचन अधिकारी दिग्दर्शित किरण कुलकर्णी v/s किरण कुलकर्णी या चित्रपटातील कलाकार सुबोध भावे आणि क्रांती रेडेकर यांनी स्वत:च प्रमोशन साँग गायले आहे. आपल्या अभिनयाप्रमाणेच आवाज देखील ते प्रेक्षकांपर्यत पोहोचविण्यास सज्ज झाले आहे. होऊ दे खुश्शाल खर्च असे हे प्रमोशनल गाणं असून या गाण्याचे बोल मंदार चोळकर यांनी लिहिलेआहे तर वैशाली सामंत हिने  संगीत दिले आहे. सायबर क्राइमवर आधारलेला कॉमेडी क्राइम हा चित्रपट आहे. या चित्रपटाचा कथाविस्तार व दिग्दर्शन कांचन अधिकारी यांचं आहे. लेखन आशिष पाथरे यांनी केले आहे. कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित किरण कुलकर्णी  v/s  किरण कुलकर्णी  या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत.