Join us
Daily Top 2Weekly Top 5

कास्टिंग काउचमध्ये प्रिया बापट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 14:09 IST

अमेय वाघ व निपुण धर्माधिकारी यांच्या कास्टिंग काउचमध्ये यंदा मराठी इंडस्ट्रची सुंदर अभिनेत्री प्रिया बापट असणार आहे. या वेबमालिकेत कोण असणार याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना लागलेली असते.

अमेय वाघ व निपुण धर्माधिकारी यांच्या कास्टिंग काउचमध्ये यंदा मराठी इंडस्ट्रची सुंदर अभिनेत्री प्रिया बापट असणार आहे. या वेबमालिकेत कोण असणार याची उत्सुकता नेहमीच प्रेक्षकांना लागलेली असते. आता ही  वेबसिरीज पाचव्या एपिसोड पर्यत पोहोचलेली आहे. यापूर्वी या वेबसिरीजमध्ये रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, श्रिया पिळगावकर, राधिका आपटे आदि कलाकारांनी उपस्थिती लावली. ही वेबसिरीज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कलाकारांना घेऊन मनोरंजन करत असते. त्यामुळे प्रेक्षक देखील या वेबमालिकेची उत्साहाने वाट पाहत असतात. पण यंदा चुलबूली प्रिया बापटसोबत मस्ती करताना अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी पाहायला मिळणार आहे. या दोन कलाकारांनी या एपिसोडची सुरूवातच ओ प्रिया ओ... प्रिया ओ प्रिया करतच प्रियाचे वेलकम केले.