Join us

आईने काय दिला प्रिया आणि सईला सल्ला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2016 15:42 IST

          वजन वाढले कि आजच्या मुलींना आपण कधी एकदा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतोय आणि ...

 
 
        वजन वाढले कि आजच्या मुलींना आपण कधी एकदा जिममध्ये जाऊन वर्कआऊट करतोय आणि झिरो साईज होतोय असेच वाटते. त्यातही अभिनेत्री म्हटले की मग तर काही विचारुनच नका. पडद्यावर आपण सुंदरच दिसले पाहिजे म्हणून घाम गाळणाऱ्या  हिरोईन्स आपल्याला  नेहमीच बघायला मिळतात. आता हेच पाहा ना वजनदार या चित्रपटासाठी अभिनेत्री प्रिया बापट आणि सई ताम्हणकर या दोघींनीही वजन वाढवले होते. नेहमी डायेटवर असणाऱ्या, मोजुन मापुन खाणाऱ्या या अभिनेत्री मात्र वजनदारसाठी वजन वाढवताना मस्त गोड-मसालेदार पदार्थांवर ताव मारत होत्या. भरपूर खात होत्या. मग काय आपली लाडकी लेक रोज मस्त जेवण करतेय याचा सर्वात जास्त आनंद प्रिया आणि सईच्या आईलाच झाला. सईच्या आईने तर तिचे वजन छान वाढले म्हणून दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांना गिफ्ट्स पाठवले. तर प्रियाची आई तिला म्हणाली, तू अशी वजन वाढलेल्या जास्त छान दिसते आहेस. त्यामुळे बिलकुलच वजन कमी करु नकोस. आता जशी आहेस तशीच रहा. आमच्या पोरी छान खात-पित आहेत याचाच आनंद आमच्या दोघींच्या आईला झाला असल्याचे प्रिया आणि सईने सांगितले. वजनदार या चित्रपटासाठी दोघींनीही अपार मेहनत घेतली आहे. वजन वाढवणे काही सोपे काम नाही. आणि त्यातही अवघड म्हणजे वाढलेले वजन कमी करणे. प्रियाने वजन वाढवून पुन्हा 16 किलोने वजन कमीदेखील केले. एवढेच नाही तर वजन वाढलेल्या वाजनामुळे प्रिया घरातून बाहेर निघत नव्हती ती कोणत्याही कार्यक्रमात जात नव्हती. फक्त शूटिंग आणि शूटिंग एवढेच तिने केले होते. खरेच आहे म्हणा, कलाकार एखादया भूमिकेसाठी शंभर टक्के योगदान देतात हे यावरूनच दिसून येते.