Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंध-मुक्त नाटकाचा प्रीमिअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 13:29 IST

बॉलिवुड व मराठी चित्रपटांप्रमाणेच आता, नाटकाचा देखील प्रीमिअर आपल्याला पाहायला मिळणार आहे. . आता, मराठी चित्रपटांचे प्रीमिअरहीदेखील उत्साहात साजरे ...

बॉलिवुड व मराठी चित्रपटांप्रमाणेच आता, नाटकाचा देखील प्रीमिअर आपल्याला पाहायला मिळणार आहे. . आता, मराठी चित्रपटांचे प्रीमिअरहीदेखील उत्साहात साजरे होत असल्याचे दिसत आहे. विवेक आपटे लिखित आणि डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित बंधमुक्त या आगामी नाटकाची सुरुवात प्रीमिअरने करण्यात येणार आहे. रंगभूमीच्या इतिहासात पहिल्यांदाच चित्रपट, नाटक, साहित्य, राजकारण, वैद्यकीय, उद्योग आणि सामाजिक क्षेत्रांतील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रीमिअर सोहळा साजरा करण्यात येणार आहे.जगदंब क्रिएशन्स निर्मित आणि तिरकिटधा प्रस्तुत या नाटकाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे अभिनेता डॉ. अमोल कोल्हे याचे दीर्घ कालावधीनंतर रंगमंचावर पुनरागमन होत असून तो या नाटकाचा एक निमार्ताही आहे. त्याच्यासह विलास सावंत, सोनाली राव हे नाटकाचे निमार्ते असून डॉ. अजित देवल हे सहनिमार्ते आहेत. नाटकाचे पाश्र्वसंगीत राहुल रानडे यांचे असून प्रकाशयोजना शीतल तळपदे व नेपथ्य राजन भिसे यांचे आहे. नाटकात स्वत: अमोल कोल्हेसह केतकी थत्ते, राजन बने, शंतनू मोघे, विवेक आपटे, पंढरी मेदगे, लतिका सावंत हे कलाकार आहेत. १२ आॅगस्ट रोजी मुंबईत रवींद्र नाटय मंदिर येथे नाटकाचा प्रीमिअर होणार आहे.