प्रार्थना बेहेरेचा पहिला डबस्मॅश
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2017 14:51 IST
उशीरा का होईना प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिलादेखील डबस्मॅशचा मोह पडला असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. हो, कारण प्रार्थनाने नुकताच सोशलमीडियावर एक डबस्मॅश व्हिडीओ सोशलमीडियावर अपलोड केला आहे.
प्रार्थना बेहेरेचा पहिला डबस्मॅश
सध्या सेल्फीप्रमाणेच प्रत्येक व्यक्ती हा डबस्मॅशच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. मध्यंतरी डबस्मॅशची खूपच क्रेझ पाहायला मिळाली. मात्र आता डबस्मॅशच्या तुलनेत सेल्फी हीट असल्याचे दिसत आहे. पण उशीरा का होईना प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिलादेखील डबस्मॅशचा मोह पडला असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. हो, कारण प्रार्थनाने नुकताच सोशलमीडियावर एक डबस्मॅश व्हिडीओ सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर हा माझा पहिला डबस्मॅश असल्याचे तिने आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगितले आहे. ती आपल्या या व्हिडीओमध्ये पार्टी दे...पार्टी दे हे गाणे म्हणत आहे. हे गाणे तिच्या आगामी फुगे या चित्रपटातील आहे. हे गाणं अमितराज याने गायले असून संगीतदेखील त्याने दिले आहे. तर या गाण्याचे लिखाण क्षितीज पटवर्धन याने केले आहे. हे गाणे सध्या खूपच गाजत असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशलमीडियावरदेखील या गाण्याला प्रचंड पसंती मिळाली आहे. हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित होणार होता. मात्र काही अडचणींमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे. पूर्वी ही या चित्रपटाचे प्रमोशन ही भन्नाट पाहायला मिळाले होते. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार फुगे घेऊन डान्स करत असतानाचे काही व्हिडीओ मध्यंतरी सोशलमीडियावर पाहायला मिळाले आहे. आता पुन्हा या चित्रपटाचे प्रमोशन जोरात चालू असल्याचे दिसत आहे. मात्र या चित्रपटाची कथा काय आहे हे प्रेक्षकांना पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पार्टी दे या गाण्याने सोशल मीडियावर कल्ला केलेले दिसत आहे. त्यामुळे पार्टी दे हे गाणेदेखील झक्कास झाले आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत अश्विन आंचन, अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी यांनी फुगे चित्रपटाची निर्मिती केली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.