Join us  

लंडन दौऱ्यात प्रवीण तरडेंनी विल्यम शेक्सपिअरच्या घराला दिली भेट, व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 1:10 PM

प्रवीण तरडेंनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली.

आरारारा खतरनाक… हे दोन शब्द जरी ऐकले तरी डोळ्यासमोर एकच नाव उभं राहतं ते म्हणजेच प्रवीण तरडे! बिनधास्त व बेधडक स्वभाव, कितीही यश मिळवलं तरी मातीशी जोडली गेलेली नाळ आणि स्वभावातील स्पष्टवक्तेपणामुळे प्रवीण तरडे कायम चर्चेत असतात.  27 मार्च जागतिक रंगभूमी दिनानिमित प्रवीण तरडेंनी एक खास व्हिडीओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी हा व्हिडीओ थेट लंडनमधील विल्यम शेक्सपिअरच्या घरातून शेअर केला आहे.  

प्रवीण तरडेंनी जगप्रसिद्ध लेखक व नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या घराला भेट दिली आहे. त्यांच्या घराबाहेर उभं राहून काढलेला एक व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. यात ते म्हणतात, 'हे विल्यम शेक्सपिअर यांचं घर, संपूर्ण घर पाहताना एक वेगळाच आनंद झाला. त्यांचं सगळं घर पाहून मी बाहेर आलो आणि एका गोष्टीवर माझी नजर गेली. अर्थात ती गोष्ट पाहून माझा आनंद द्विगुणित झाला'. 

\

पुढे ते म्हणतात, 'प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावी अशी ही गोष्ट म्हणजे आपले रवींद्रनाथ टागोर यांचा ब्रांझ धातूतला पुतळा विल्यम शेक्सपिअरच्या घरात लावलेला आहे. हा पुतळा पाहून आपले भारतीय लेखक, साहित्यकार, नाटककार किती मोठे होते याची प्रचिती आपल्याला येते. खरंच ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे'. प्रवीण तरडे यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे. 

टॅग्स :प्रवीण तरडेसेलिब्रिटीसोशल मीडिया