Join us

अभिनेत्री प्रार्थना बेहरने शेअर केलं ग्लॅमरस फोटो, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2021 17:00 IST

. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती.

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत असते. नुकतेच प्रार्थनाने तिचे व्हाईट रंगाच्या स्कर्ट टॉपलं फोटोशूट शेअर केला आहे. या फोटोशूटमध्ये प्रार्थना खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसतेय. प्रार्थनाचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. तिच्या फॅन्सनादेखील हे फोटोशूट आवडलं आहे. 

प्रार्थना बेहरेने काही महिन्यांपूर्वी लंडनमध्ये छूमंतर चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. या चित्रपटात प्रार्थना बेहरेसोबत अभिनेत्री रिंकू राजगुरू, अभिनेता सुव्रत जोशी आणि ऋषी सक्सेना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत. तिथे शूटिंग करतानाचे फोटो आणि व्हिडीओ कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

छूमंतर शिवाय प्रार्थना एका हिंदी वेबसीरिजमध्ये देखील दिसणार आहे. प्रार्थनाने आपल्या करिअरची सुरुवात छोट्या पडद्यावरून केली होती. याआधी तिने 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमात तिने काम केलं आहे. 

टॅग्स :प्रार्थना बेहरे