Join us

चक्क प्रसादने प्रशांत दामलेंना दिला भूमिका देण्यास नकार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 15:33 IST

मराठी रंगभूमीवर अनोखे विषय असलेली नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच येत असतात.

मराठी रंगभूमीवर अनोखे विषय असलेली नाटकं प्रेक्षकांच्या भेटीला नेहमीच येत असतात. सध्या सगळीकडे एका नवीन नाटकाचा टीझर व्हायरल होताना दिसतोय. ज्यात अभिनेता प्रसाद ओक प्रशांत दामलेंना चक्क भूमिका नाकारताना दिसत आहे. तू २२ वर्षांचा वाटतोस त्यामुळे तू नकोच असं प्रसाद ओक म्हणताना दिसत आहे. त्यावर प्रशांत दामले म्हणतात तू म्हणशील तसं. 

हा टीझर सध्या नेटवर तुफान गाजतोय.. महत्वाचं म्हणजे मराठी रंगभूमीवरील सुपरस्टार प्रशांत दामले आणि प्रसाद ओक यांचं तू म्हणशील तसं हे नाटक लवकरच रंगभूमीवर येणार आहे. ही नाट्यरसिकांसाठी मोठी मेजवानी आहे. सध्या प्रशांत दामलेंचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक रंगभूमीवर तुफान गाजत आहे. प्रशांत दामले आणि कविता लाड या सुपरहिट जोडीला रसिकांनी पुन्हा एकदा उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातच प्रशांत दामलेंच्या या आगामी नाटकाच्या टीझरमुळे आणि त्यांच्या साथीला हरहुन्नरी प्रसाद ओकची साथ असल्याने सोने पे सुहागा अशीच भावना प्रेक्षकांच्या मनात आहे. त्यामुळे प्रसाद ओक आणि प्रशांत दामले या दोन दिग्गज कलाकारांचे हे अप्रतिम नाटक कधी एकदा रंगमंचावर येणार याची आता उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

टॅग्स :प्रशांत दामलेप्रसाद ओक