प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार नाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 15:14 IST
आपल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना पाटेकर आता, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दिग्गज दिग्दर्शक प्रकाश राज यांच्या चित्रपटात ...
प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार नाना
आपल्या अभिनयाने प्रक्षकांच्या मनावर राज्य करणारे नाना पाटेकर आता, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दिग्गज दिग्दर्शक प्रकाश राज यांच्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ते महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट प्रकाश राज यांच्या तामिळमध्ये सुपरहीट ठरलेला उन समायल अरायील या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. या चित्रपटात नानांसोबत श्रिया सरन, अली फजल व तापसी पन्ना या कलाकारांचा समावेश आहे.