Join us

"आपण सतत भेटत..." रेणुका शहाणे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत प्राजक्ता माळी म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 12:20 IST

प्राजक्ता माळीने अभिनेत्री रेणुका शहाणे यांच्याबरोबर फोटो शेअर केला.

प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ताला आपण विविध सिनेमा, मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय. प्राजक्ता माळी सातत्याने चर्चेत येत असते. कधी तिच्या लूकमुळे तर कधी तिच्या खासगी आयुष्यामुळे. प्राजक्ता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि तिच्या पोस्टना नेहमीच चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो. तिच्या इंस्टाग्रामवर २.३ दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. प्राजक्ता तिच्या व्यावसायिक तसेच खासगी आयुष्यातील अनेक अनुभवदेखील सोशल मीडियावर शेअर करते.

अलीकडेच, प्राजक्ताने तिच्या इंस्टाग्रामवर एक अत्यंत गोड फोटो शेअर केला आहे, ज्यात तिच्यासोबत ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेत्री रेणुका शहाणे दिसत आहेत. कलाविश्वातील एका पिढीचा दुसऱ्या पिढीबद्दल असलेला आदर या फोटोतून स्पष्ट दिसून येतोय. प्राजक्ताने हा फोटो शेअर करताना एक खास कॅप्शन लिहिले. तिने रेणुका शहाणे यांना टॅग करत लिहिले, "आतून आणि बाहेरून सुंदर असलेली स्त्री... आपण सतत भेटत राहिले पाहिजे". या पोस्टमधून प्राजक्तानं तिच्या मनात रेणुका शहाणे यांच्याप्रती असलेला आदर आणि प्रेम सहजपणे व्यक्त केले. प्राजक्ताची ही इंस्टाग्राम स्टोरी रेणुका शहाणे यांनीही रिपोस्ट केली आहे.

प्राजक्ता माळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'चिकी चिकी बुबूम बूम' सिनेमात पाहायला मिळाली होती. त्या आधी ती 'फुलवंती' सिनेमात दिसली होती. या सिनेमात तिने मुख्य भूमिकेत काम केले आणि या चित्रपटातून तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. प्राजक्ताच्या नवीन सिनेमाबद्दल अजून कोणतीही अपडेट समोर आली नाहीये.

टॅग्स :प्राजक्ता माळीरेणुका शहाणे