तेजश्री प्रधान आणि उमेश कामतची जमणार का जोडी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 13:59 IST
अभिनेत्री तेजश्री प्रधान आज तिच्या मालिकांमुळे आणि चित्रपटातील दर्जेदार अभिनयाने घराघरात पोहचली आहे. तसेच अभिनेता उमेश कामत देखील, मालिका, ...
तेजश्री प्रधान आणि उमेश कामतची जमणार का जोडी?
अभिनेत्री तेजश्री प्रधान आज तिच्या मालिकांमुळे आणि चित्रपटातील दर्जेदार अभिनयाने घराघरात पोहचली आहे. तसेच अभिनेता उमेश कामत देखील, मालिका, चित्रपट किंवा नाटकाच्या यशस्वी प्रयोगांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. आता हे दोघेही एका नवीन प्रोजेक्यसाठी एकत्र येणार असल्याचे समजतेय. असे आम्ही सांगत नाही, तर या दोघांचाही एक फोटो असलेली पोस्ट सध्या सोशल साईट्सवर चर्चेचा विषय झाली आहे. त्याचे झाले असे की, दिग्दर्शक सुश्रूत भागवत यांनी फेसबुकवर तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपल्याला तेजश्री आणि उमेश हे दोघेही एकत्र पाहायला मिळतायत. एवढेच नाही तर या नवीन चित्रपटासाठी हे दोघेही वर्कशॅप घेत असल्याचे कळतेय. अभिनेत्री शर्वरी पिल्लई देखील या सिनेमात आपल्याला दिसणार असल्याचे समजतेय. तसेच या चित्रपटात कदाचित आपल्याला उमेश्चा एक हटके लुक दिसू शकतो. रॉकस्टारच्या भूमिकात जर या सिनेमातून उमेश प्रेक्षकांसमोर आला तर जास्त आचर्य वाटायला नको. कारण एका फोटोमध्ये उमेश गिटार हातात घेऊन वाजवताना दिसतोय. मग आता त्याने फक्त कॅमेºयाला पोझ देण्यासाठी गिटार हातात पकडली आहे का? हे तर आपल्याला काही दिवसाच समजेलच. परंतू बºयाच दिवसांनंतर मराठी सिनेमात एक रिफ्रेश आणि हटके जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार एवढे मात्र नक्की.