गणवेश चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2016 16:01 IST
गणवेश या चित्रपटाची चर्चा गेली कित्येक दिवस रंगत आहे.पण या चित्रपटात कोण असेल, कहानी काय असेल याची उत्सुकता सर्वानाच ...
गणवेश चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
गणवेश या चित्रपटाची चर्चा गेली कित्येक दिवस रंगत आहे.पण या चित्रपटात कोण असेल, कहानी काय असेल याची उत्सुकता सर्वानाच लागली होती. पण ती त्या प्रकारे आॅफिशीयली माहिती कोणालाच नव्हती. पण फायनली या चित्रपटाचे आॅफिशियली पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. अतुल जगदाळे दिग्दर्शित गणवेश या चित्रपटाची कहानी एका वीटभट्टी कामगार जोडप्याची आणि त्यांच्या मुलाभोवतीची कथा सांगण्यात आली आली आहे. १५ आॅगस्टच्या निमित्ताने स्वातंत्र्य हया विषयावर आधारीत भाषण करण्यासाठी त्यांच्या मुलाची निवड होते. पण त्यासाठी शाळेचा गणवेश आवश्यक असतो. या गणवेश मागे नेमकी कोणती कथा उलगडते हे रंजक पध्दतीने या चित्रपटात पाहायला मिळेल. तसेच या चित्रपटात मुक्ता बर्वे, स्मिता तांबे,किशोर कदम, दिलीप प्रभावळकर अशा तगडया कलाकारांचा समावेश आहे. आणि बालकलाकार तन्मय मांडे हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. गणवेश या चित्रपटाचे पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांनी दिले आहे. तर गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या गीतांना नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी आवाज दिला आहे.