Join us

पूजा सावंतची लगीनघाई! होणाऱ्या नवऱ्याबरोबर केला रोमँटिक डान्स, संगीत सोहळ्यातील व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2024 08:52 IST

Pooja Sawant Wedding : पूजा-सिद्धेशचा संगीत सोहळाही नुकताच पार पडला आहे. या संगीत सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

मराठी कलाविश्वात सनई चौघडे वाजत आहेत. शिवानी सुर्वे, प्रथमेश परब यांच्यानंतर आता मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत लग्नबंधनात अडकणार आहे. नुकताच पूजाचा साखरपुडा पार पडला. आता तिच्या घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. पूजा लवकरच सिद्धेश चव्हाणसोबत सात फेरे घेत नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे. पूजा-सिद्धेशचा संगीत सोहळाही नुकताच पार पडला आहे. या संगीत सोहळ्यातील काही व्हिडिओ समोर आले आहेत. 

पूजा आणि सिद्धेशच्या संगीत सोहळ्याला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. संगीत सोहळ्यात पूजा आणि सिद्धेशने रोमँटिक डान्सही केला. याचा व्हिडिओ समोर आला आहे. साडी के फॉल सा या बॉलिवूड गाण्यावर पूजा होणारा नवरा सिद्धेशबरोबर थिरकली. संगीत सोहळ्यातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पूजा आणि सिद्धेशसाठी कुटुंबीयांनीही डान्स करत संगीत सोहळ्याला चार चांद लावले. 

संगीत सोहळ्यासाठी पूजाने खास डिझायनर लेहेंगा आणि त्यावर खड्यांची ज्वेलरी घालत ग्लॅमरस लूक केला होता. तर सिद्धेशने सूट परिधान केला होता. पूजाच्या संगीत सोहळ्याला अमृता खानविलकर, सई गोडबोले, मेधा मांजरेकर, वैभव तत्ववादी, भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे, पुष्कर जोग यांनी हजेरी लावली होती. 

काही महिन्यांपूर्वीच पूजाने सिद्धेशवरील प्रेमाची कबुली दिली होती. तिने सिद्धेशबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर पूजाच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. एक वर्ष डेट केल्यानंतर पूजा आणि सिद्धेशने लग्न करत एकमेकांचे कायमचे सोबती होण्याचा निर्णय घेतला आहे. साखरपुड्यानंतर आता पूजा आणि सिद्धेश लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रेटी वेडिंगसेलिब्रिटी