Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2024 13:13 IST

Pooja Sawant Wedding : पूजाच्या हळदीला बहीण भावुक, अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आलं पाणी

मराठी सिनेसृष्टीची लाडकी अभिनेत्री पूजा सावंतची लगीनघाई सुरू आहे. पूजा सिद्धेश चव्हाणबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. साखरपुड्यानंतर पूजाचा संगीत सोहळा पार पडला. त्यानंतर मेहेंदी आणि हळदी समारंभही दणक्यात पार पडला. याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पूजाच्या हळदी समारंभातील एक व्हिडिओ समोर आला आहे. 

हळदी समारंभासाठी पूजाने जांभळ्या रंगाचा लेहेंगा आणि ज्वेलरीने खास लूक केला होता. तर सिद्धेशनेही तिला ट्विनिंग करत जांभळ्या रंगाचा सेट परिधान केला होता. लग्नाच्या आधी हळदी समारंभात पूजा भावुक झालेली पाहायला मिळाली. पूजाला छोटी बहीण रुचिराने हळद लावताच तिच्या डोळ्यातून अश्रू आले. पूजाला पाहून रुचिराही भावुक झाली. पूजाच्या हळदी समारंभातील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

पूजा आणि सिद्धेश आज(२८ फेब्रुवारी) विवाहबंधनात अडकणार आहेत. कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत सात फेरे घेत ते नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहेत. काही महिन्यांपूर्वी पूजाने सोशल मीडियावर सिद्धेशबरोबरचा फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. आता ते आयुष्यभरासाठी एकमेकांचे सोबती होणार आहेत. 

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रेटी वेडिंग