पूजा सावंत ‘बस स्टॉप’ साठी सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 20:02 IST
‘पोश्टर बॉईज’, ‘निळकंठ मास्तर’, ‘दगडी चाळ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’ आदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली पूजा सावंत आता तिच्या ...
पूजा सावंत ‘बस स्टॉप’ साठी सज्ज
‘पोश्टर बॉईज’, ‘निळकंठ मास्तर’, ‘दगडी चाळ’, ‘मामाच्या गावाला जाऊया’ आदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडलेली पूजा सावंत आता तिच्या ‘बस स्टॉप’ या आगामी चित्रपटासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती ‘बस स्टॉप’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त असून हा चित्रपटदेखील हिट होईल अशी तिला आशा आहे. मात्र याच बरोबर ती ८ एप्रिल रोजी प्रदर्शित होणाºया राकेश बापट सोबतचा ‘वृंदावन’ या चित्रपटाविषयी खूप उत्साही आहे. समीर जोशी दिग्दर्शित ‘बस स्टॉप’ चित्रपटात तिच्या सोबत अमृता खानविलकर, अनिकेत विश्वासराव, सिद्धार्थ चांदेकर आणि रसिका सुनील यांच्या अभिनयाची जुगलबंदी दिसणार आहे.