Join us

गोष्ट तशी गंमतीची हे नाटक आता, गुजरातीमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2016 17:52 IST

रंगभूमीवर सध्या मराठी नाटकांची चलती सुरू आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील देशभरात गाजत आहे. मराठी नाटक आता, इंग्रजी, गुजराती ...

रंगभूमीवर सध्या मराठी नाटकांची चलती सुरू आहे. मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी रंगभूमीदेखील देशभरात गाजत आहे. मराठी नाटक आता, इंग्रजी, गुजराती अशा विविध भाषांमध्ये येत आहे. असेच एक मराठी नाटक आता, गुजरातीमध्ये येणार आहे. गोष्ट तशी गंमतीची असे या नाटकाचे नाव आहे. हे मराठी नाटक सध्या लोकप्रिय होऊ लागले आहे. या नाटकमध्ये शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम या कलाकारांचा समावोश आहे. तर गुजरातीमध्ये या नाटकाचे नाव गुजरातीमध्ये रेडी स्टेडी गो असे आहे.  सोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित गोष्ट तशी गंमतीची या नाटकाचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे तर लिखान  मिहिर राजदा लिखित यांनी केले आहे.