ट्रँगल लवस्टोरीजचा परफेक्ट अँगल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2016 10:49 IST
लव स्टोरीज म्हटले कि डोळ््यासमोर आपसुकच समुद्रकिनारी रोमँटिक गाणे गाणारा हिरो... त्याच्या गाण्यावर लाजणारी ...
ट्रँगल लवस्टोरीजचा परफेक्ट अँगल
लव स्टोरीज म्हटले कि डोळ््यासमोर आपसुकच समुद्रकिनारी रोमँटिक गाणे गाणारा हिरो... त्याच्या गाण्यावर लाजणारी हिरोईन असे दृष्य नक्कीच तरळून जाते. पण सगळ््याच प्रेमकथा काही एवढ्या साध्या सोप्या नसतात अन सगळच हॅपी-हॅपी असेल ती प्रेमकथाच कसली. दोघीत तिसरा किंवा दोघांत तिसरी आल्याशिवाय त्या प्रेमकहाणीला रंग चढत नाही हेच खरे. तिच्यावर जीव तोडुन प्रेम करणारा तो अन त्याच्या प्रेमात अखंड बुडालेली ती अन त्याच्यासाठी आतल्याआत मनात झुरणारी दुसरीच कोणीतरी. असे झाले की समजा त्या लव्हस्टोरीमध्ये ट्रँगल झाला अन मग काय त्या सिनेमाला आपोआपच परफेक्ट अँगल मिळाला. आता अशा प्रकारचे अनेक हिंदी-मराठी सिनेमे आले ज्यामध्ये ट्रँगल लवस्टोरीज दाखविल्या गेल्या अन हा विषय तरुणांच्या इमोशन्सशी अगदी मॅच होत असल्याने प्रत्येकजण त्यात आपलीच कहाणी शोधत असतो. मग काय अशा ट्रँगल लवस्टोरीजला युथच्या लाईक्स मिळून त्या सुपरहिट होतात. अशाच काही हिट ट्रँगल लव स्टोरीजचा सीएनएक्सने घेतलेला आढावा दुनियादारी : दोस्तोंकी दुनियादारी आणि सच्च्या मित्रांची कहाणी दाखविणारा दुनियादारी हा सिनेमा कट्ट्यावरच्या प्रत्येक मित्रालाच आपलासा वाटतो. पण या दुनियादारीमध्ये देखील मैत्री पलीकडे जाऊन प्रेमाचे हळूवार नाते उलगडलेच आहे. शिरीन साठी पागल असलेला श्रेयस लपुनछपुन तिच्यावर प्रेम करतो. मित्राच्या सांगण्यावरुन मिनु साठी प्रेमाचे खोटे नाटक करतो. अन त्या नाटकामध्ये हरवलेली मिनू नकळतपणे श्रेयसच्या प्रेमात पडते अन सुरु होते यांच्या प्रेमकहाणीची खरी कहाणी. श्रेयस-शिरीन-मिनू हा लव ट्रँगल दुनियादारीमध्ये एवढ्या रिअॅलिस्टीक पद्धतीने दाखविला आहे कि काही क्षणांसाठी डोळ््यात पाणी आल्याशिवाय राहत नाही अन म्हणुनच दुनियादारीतील ही लव स्टोरी प्रेक्षकांना अपील झाली. क्लासमेट : मैत्रीची पुढची स्टेप म्हणजे प्रेम असे म्हणतात खरे पण क्लासमेट या सिनेमामध्ये देखील आपल्याला हेच पहायला मिळते. सई ताम्हणकर, अंकुश चौधरी अन सोनाली कुलकर्णी यांच्यातील ट्रँगल या सिनेमामध्ये दाखविण्यात आला आहे. कॉलेजमध्ये टवाळक्या, टूकारगिरी करणाºया सत्याचा ग्रुप अन त्याची एकदम खास मैत्रिण अप्पु जी कधीच मुलींसारखी नसते तर एकदम डॅशिंग, मारमारी करणारी अन रांगड्या लुमध्ये सतत वावरणारी अशी बिनधास्त मुलगी असते. अचानक सत्याच्या आयुष्यात आदिती येते अन मग अप्पुला सत्याविषयी आसलेल्या प्रेमाची जाणीव होते ही भावस्पर्षी कहाणी पाहताना मन भरुनआल्या शिवाय राहत नाही. असे सत्या-अप्पु-आदिती आजही कोणत्या ना कोणत्या कॉलेज कट्ट्यावर आपल्याला नक्कीच पहायला मिळतील. मितवा : नात्याला काही नाव नसावे तु ही रे माझा मितवा.... असे गाणे जरी असले तरी अवनी अन शिवमच्या मैत्रीच्या नात्याला प्रेमाचा स्पर्ष होतोच आणि सुरु होते कहाणी लव ट्रँगलची. अल्लड, बेफीकीर, लाईफ एकदम स्वत:च्याच मनाप्रमाणे जगणारा शिवम अन त्याची केअर करणारी अवनी दोघेही एकमेकांचे खुपच क्लोज फ्रेन्डस असतात. अवनी कुठेतरी शिवमच्या नकळतपणे प्रेमात असते पण कधी त्याला सांगत नाही. मग एन्ट्री होते नंदिनीची तिला पाहताच शिवम तिच्या प्रेमात पडतो अन मग या प्रेमकहाणीत अवनीलाच तिच्या प्रेमाचा त्याग करावा लागतो. तु हि रे : लग्नाअधीची प्रेयसी लग्नानंतर जर एखाद्याच्या आयुष्यात पुन्हा आली तर त्याच्या संसाराची फरपट झाल्याशिवाय राहत नाही. अशीच एक वेगळी प्रेमकहाणी पहायला मिळते तु हि रे मध्ये सिद्धार्थ, नंदिनी अन भैरवी ची. कॉलेजमध्ये फुललेले सिद्धार्थ-भेरवीचे प्रेम केवळ भैरवीच्या वडिलांमुळे कोमेजुन जाते आणि मग सिद्धार्थ मुवआॅन होऊन गावातील नंदिनीशी लग्न करतो. लग्नानंतर नव्याने नंदिनीच्या प्रेमात पडलेला सिद्धार्थ तिच्याच पुर्णपणे गुंतून जातो. बायको अन मुलगी या परफेक्ट फॅमिली पिच्चर मध्ये मग एन्ट्री होते भैरवीची अन सुरु होतो नंदिनी-सिद्धार्थ-भैरवीचा ट्रँगल. या प्रेमकहाणीमध्ये शेवटी जिंकते ती नवºयावर जीव ओवाळून टाकणारी नंदिनी. प्रेमकथेला एक बाज असतो. प्रत्येक प्रेमकहाणी ही वेगळीच असते. लव स्टोरीज मध्ये जेव्हा कॉम्प्लिकेशन्स येतात तेव्हा समजायचे कि त्यामध्ये ट्रँगल आला. ट्रँगल हा फक्त मुलगा किंवा मुलीचा नसतो तर ज्यावेळी प्रेमकथेत तिसरा घटक येतो तो ट्रँगल असतो. मैने प्यास किया मध्ये देखील ट्रँगल होता आणि तो म्हणजे त्यांचे वडिल. याचाच अर्थ प्रेमात येणारा प्रत्येक अडथळाच ट्रँगल असतो. - स्वप्निल जोशी