Join us

"लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे..", सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 13:00 IST

Sayali Sanjeev : सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा आणि निवेदिता सराफ यांना मम्मा म्हणते. सायली संजीव त्यांची मानलेली लेक आहे. पण अनेकांना ती त्यांची खरी मुलगी वाटते. नुकतेच एका मुलाखतीत सायलीने तिला याबाबतीत आलेला अनुभव शेअर केला आहे.

'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) घराघरात पोहचली. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलं नाही. तिने बऱ्याच सिनेमात काम केलं. काहे दिया परदेस या मालिकेमुळे अशोक सराफ सायलीला लेक मानू लागले होते. सायली संजीवअशोक सराफ (Ashok Saraf) यांना पप्पा आणि निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांना मम्मा म्हणते. सायली संजीव त्यांची मानलेली लेक आहे. पण अनेकांना ती त्यांची खरी मुलगी वाटते. नुकतेच एका मुलाखतीत सायलीने तिला याबाबतीत आलेला अनुभव शेअर केला आहे.

सायली संजीवने नुकतेच सुमन म्युझिकला दिलेल्या मुलाखतीत तिला मेलवर लग्नाची मागणी येत असल्याचा खुलासा केला आहे. तिने म्हटले की, दिवसातून एकदा किंवा दोन दिवसातून एकदा माझ्याशी लग्न करशील का ?चा मेल असतोच असतो. म्हणजे मी आत्ता सुद्धा दाखवू शकेल माझ्याकडे त्याचा एक्सेस आहे आणि माझी जी मॅनेजर म्हणून काम करते मुलगी तिच्याकडे ते ईमेल आयडी आहे. ती मला मधेच कधीतरी महिन्यातून दोन महिन्यातून एकदा विचारते ह्या लोकांना मी काय रिप्लाय करू म्हटलं काही नाही. 

अभिनेत्रीने सांगितला किस्सा

तसेच या मुलाखतीत तिने लोक तिला अशोक आणि निवेदिता सराफ यांची खरी मुलगी मानतात, याबद्दल तिला आलेला अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, ''एक गृहस्थ मला भेटले आणि ते मला म्हणाले की तू अशोक सराफांची मुलगी ना मी म्हटलं हा. मानलेली. कारण असं कसं मी म्हणू ना की हो मी म्हटलं हा मानलेली. नाही नाही तू अशोक सराफांची मुलगी ना खरी म्हटलं नाही हो म्हणजे आहे. ते मला मुलगी मानतात. माझे खरे आई वडील वेगळे आहेत. तर ते मला म्हणाले की नाही नाही. तू अशोक सराफांचीच मुलगी आहेस. मी म्हटलं नाही काका. माझ्या वडिलांचं नाव संजीव आहे. माझ्या आईचं नाव शुभांगी आहे. सायली संजीव म्हणूनच मी नाव लावते. तर ते माझ्यावर ओरडले शक्यच नाही. हे शक्यच नाही होणं म्हटलं पण काय माझे वडील वेगळे आहेत. नाही म्हणे तू अशोक सराफचीच मुलगी आहे. तू निवेदिता आणि अशोक सराफचीच मुलगी आहे. '' 

टॅग्स :सायली संजीवअशोक सराफनिवेदिता सराफ