‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब सिरीजचा ५व्या वेब एपिसोडनंतर प्रेक्षक हमखास ६व्या एपिसोडच्या प्रतिक्षेत असणार. प्रेक्षकांचे मनोरंजन करायला अमेय आणि निपुण पण नेहमी तयार असतात. आता ६ व्या वेब एपिसोडमध्ये अभिनेत्री रिमा लागू येणार आहेत.
अमेय आणि निपुणच्या चित्रपटात एक नवीन अडथळा निर्माण झाला आहे. निर्मात्याला खराखुरा सलमान हवा आहे. पण सध्या सलमान त्याच्या चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये व्यस्त आहे. खरा सलमान येईल की नाही माहित नाही पण खरीखुरी आई येणार हे मात्र नक्की.
६ व्या वेब एपिसोडमध्ये अमेय आणि निपुणची गोंधळलेली मनस्थिती पाहायला मिळेल. रिमा लागू अमेय आणि निपुण च्या ऑफरला नाकारतील का?
सध्या पाहा हा ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुण’ या वेब सिरीज च्या ६व्या भागाचा टिझर-