Join us

आता माझी हटली या चित्रपटाचा संगीतप्रकाशन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:14 IST

adr शालीन आर्ट्स प्रॉडक्शन आणि श्री जगन्नाथ एंटरटेनमेंट निर्मित व वासू फिल्म्स ग्लोबल प्रस्तुत आता माझी हटली या चित्रपटाचा दिमाखात ...

adr शालीन आर्ट्स प्रॉडक्शन आणि श्री जगन्नाथ एंटरटेनमेंट निर्मित व वासू फिल्म्स ग्लोबल प्रस्तुत आता माझी हटली या चित्रपटाचा दिमाखा संगीत प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार भरत जाधव, रुचिता जाधव, हर्षा गुप्ते, विजय गोखले, काळू बाळू, अनिल खाडे, निमार्ता शालीन सिंग, आदित्य नारायण सिंग, परेश दवे, दिग्दर्शक महेंद्र देवळेकर, छाया दिग्दर्शक अनिल विश्वकर्मा, संगीतकार प्रशांत हेडावू, गायक आदर्श शिंदे, कविता निकम, साहस दृश्य दिग्दर्शक एझाज भाई, संकलक फैझल महाडिक, नृत्य दिलीप मेस्त्री, कला दिग्दर्शक मो. असलम आदी मान्यवर उपस्थित होते. आता माझी हटलीमध्ये ५ गाणी असून आनंद शिंदे, आदर्श शिंदे, कविता निकम, यांनी ती गायली असून प्रशांत हेडाऊ यांनी संगीत दिले आहे.आता माझी हटली हा मराठी सिनेमा सामाजिक विनोदी पद्धतीने मांडला आहे.