Join us  

सई ताम्हणकरचा आवडता पक्ष आणि नेता कोणता ? अभिनेत्रीच्या उत्तराची होतेय चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 4:19 PM

सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे.

मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री अशी सई ताम्हणकरची ओळख आहे. सईने फक्त मराठी इंडस्ट्रीच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपली खास ओळख निर्माण केली आहे. सईने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. तिची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.  चित्रपटसृष्टीवर ती कायमच भाष्य करत असतो मात्र आता तिने राजकीय व्यक्तींवर आपले मत व्यक्त केले आहे.

अलिकडेच सईने 'मुंबई तक'ला मुलाखत दिली. यावेळी तुझा आवडता पक्ष  कोणता आहे, असा प्रश्न सईला विचारण्यात आला. यावर ती म्हणाली, सई ताम्हणकर हाच माझा आवडता पक्ष आहे. कारण त्याला पुढे घेऊन जाणारी मीच आहे. पण, राजकीय नेते कोणते आवडतात हे मी जरूर सांगू इच्छिते. मला नितीन गडकरी खूप आवडतात. त्याचं काम मला खूप आवडतं. ते जसे बोलतात ते मला भयंकर आवडतात. मला बाळासाहेब ठाकरे हे धडाडीचे नेते म्हणून खूप आवडायचे. तसेच मला सुषमा स्वराज खूप आवडत होत्या. तसेच मला अटल वाजपेयीदेखील खूप आवडायचे'. 

पुढे ती म्हणाली, 'हे राजकारणतील मला माहिती असलेले आणि ज्यांचं आपण कौतुक आणि आदर करतो अशा व्यक्ती आहेत. बाकी राजकारणाबाबत मी ढ आहे, हे मी मनापासून बोलतेय. राजकारणात कुणाच काय सुरू आहे. याच मला अजिबात ज्ञान नसतं. मला एक माहितेय की, आपण समाजातील सगळी माणसं आहोत. माणूस आणि माणूसकी ही एकच जात आहे. माझा त्याच्यावरच खूप विश्वास आहे. मी कुठे जन्माला येते, हे माझ्या हातात नाही आणि इतर कोणीही कुठे जन्माला येतो हे कुणाच्याही हातामध्ये नसतं. त्यामुळे माणसाला माणसाप्रमाणे वागवणं हेच महत्त्वाचं आहे'. 

तर नुकतेच सईचा 'श्रीदेवी प्रसन्न' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.  या चित्रपटात सई अभिनेता सिद्धार्थ चांदेकरबरोबर पाहायला मिळाली.  यासोबतच  अभिनेत्री भूमी पेडणेकरच्या 'भक्षक' सिनेमात सई दिसणार आहे. या सिनेमात ती पोलिस ऑफिसरच्या भूमिकेत आहे.  'भक्षक'हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. हा चित्रपट 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. 

टॅग्स :सई ताम्हणकरसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटभूमी पेडणेकर सिनेमाराजकारण