Join us

नीता शेट्टी करणार फुगे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठीमध्ये पदार्पण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2017 15:31 IST

नीता शेट्टी ही फुगे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात नीता ही प्रेक्षकांना एका हटक्या अंदाजात पाहायला मिळणार आहे.

फुगे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. या चित्रपटात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे या कलाकारांचा समावेश आहे. मात्र या मराठी चित्रपटसृष्टीच्या तगडया कलाकारांसोबत प्रेक्षकांना आणखी नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. नीता शेट्टी असे या अभिनेत्रीचे नाव आहे.नीता ही फुगे या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटात नीता ही प्रेक्षकांना एका हटक्या अंदाजात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ती सुबोध भावेच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकणार आहे. ती कामिनी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, ही कामिनी बिनधास्त, चुलबुली आणि आधुनिक विचारांची आहे.या चित्रपटात नीता टॅटू आर्टिस्टची भूमिका करत असल्यामुळे 'फुगे' मधील तिचे व्यक्तिमत्व देखील तसेच रंजक आणि कलाप्रिय असे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खऱ्या आयुष्यात देखील नीता अगदी तशीच असल्यामुळे कॅमेऱ्यामधील ही कामिनी नेमकी काय धम्माल करते हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.यापूर्वी नीता शेट्टी हिने हिंदी मालिकेतून आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. या चित्रपटात कलाकारांव्यतिरिक्त आनंद इंगळे, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांचा ही समावेश आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बर्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाची प्रतिक्षा काही थोडे दिवस करावी लागणार आहे.