Join us

निलकांती पाटेकर आता ‘बर्नी’ ची आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 11:56 IST

काही कलाकार मोजक्याच भूमिका साकारतात, पण त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर होतात. असे कलाकार त्या भूमिकेत असा काही जीव ओततात ...

काही कलाकार मोजक्याच भूमिका साकारतात, पण त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा अजरामर होतात. असे कलाकार त्या भूमिकेत असा काही जीव ओततात की, त्या केवळ पडद्यावरच नव्हे, तर रसिकांच्या मनातही चिरकाल सजीव होतात.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या पत्नी या ओळखीपेक्षा 'आत्मविश्वास' या चित्रपटाद्वारे एक सशक्त अभिनेत्रीच्या रूपात समोर आलेल्या निलकांती पाटेकर या देखील याच तोलामोलाच्या अभिनेत्री आहेत. 'आत्मविश्वास' या चित्रपटानंतर एकाही चित्रपटात न दिसलेल्या निलकांती पाटेकर तब्बल २८ वर्षांनी रुपेरी पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

निलकांती यांना पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर सादर करण्याचं श्रेय निर्मात्या-दिग्दर्शिका निलीमा लोणारी यांना जातं. त्यांच्या 'बर्नी' या आगामी चित्रपटात निलकांती एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

‘बर्नी’ मधील आई 'आत्मविश्वास' मधील आईपेक्षा खूप वेगळी आहे, असं निलकांती पाटेकर सांगतात.

तेजस्वीनी लोणारीची 'बर्नी' या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. तेजस्वीनीसोबत राजन ताम्हाणे, भूषण पाटील, गिरीश परदेशी, सविता मालपेकर, किरण खोजे, सुमुखी पेंडसे, मौसमी तोंडवळकर, चैत्राली डोंगरे, राज हंचनालळे, राधिका देशपांडे या मराठीतील आघाडीच्या कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे.