Join us

'पोराचा बाजार उठला गं..'; 'झापुक झुपूक'मधलं नवीन गाणं प्रदर्शित, सूरज चव्हाणचा रोमँटिक अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 13:56 IST

 ‘झापुक झुपूक’ सिनेमातील सूरज चव्हाणवर चित्रित झालेलं नवीन गाणं भेटीला आलंय (zapuk zupuk)

सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमाची (zapuk zupuk movie) चांगलीच चर्चा आहे. काहीच दिवसांपूर्वी रितेश देशमुखच्या उपस्थितीत  ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. याशिवाय  ‘झापुक झुपूक’ सिनेमाचं जे शीर्षक गीत रिलीझ करण्यात आलं होतं, त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा सिनेप्रेमींना भुरळ घालायला ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचं नवं रोमॅन्टिक गाणं 'पोराचा बाजार उठला रं' प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात सूरज चव्हाणचा (suraj chavan) रोमँटिक अंदाज लक्ष वेधून घेतोय.

‘झापुक झुपूक’ सिनेमातलं नवीन गाणं

सूरज चव्हाण ,जुई भागवत आणि इंद्रनील कामतवर चित्रीत या गाण्यात या तिघांचा रोमॅन्टिक अंदाज पहायला मिळतोय. गाण्यात प्रेमाचा त्रिकोण आपण पाहू शकतो. या गाण्यात दिसतं की, जुईवर सूरज आणि इंद्रनीलचा जीव जडलाय. जुईची दोघांसोबत अफलातून केमिस्ट्री पहायला मिळते जी खूप सुंदर दिसत आहे. पण विशेष म्हणजे जुईचा शिफॉन सारी मधला कातिल लूक आकर्षणाचा विषय ठरतोय. या गाण्याचे बोल आणि त्याची चाल प्रेक्षकांना खिळवून ठेवतेय. गाण्याचा हुकस्टेप सुद्धा सर्वांना थिरकवणारा आहे. कलाकार आणि संगीत सोबतच या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा तितकच सुंदर आहे. ह्या गाण्याला करण सावंत ह्यांनी गायलं आहे. तर संगीत आणि बोल कुणाल करण ह्यांचं आहे.

कधी रिलीज होणार ‘झापुक झुपूक’

'पोराचा बाजार उठला रं' हे गाणं रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. गाणं पाहून सिनेरसिकांची ‘झापुक झुपूक’ सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. या चित्रपटात एक से बढकर एक इतर उत्कृष्ट कलाकार आहेत जसे हेमंत फरांदे, पायल जाधव, दीपाली पानसरे, तसेच पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी जे  मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. जिओ स्टुडिओज् प्रस्तुत, केदार शिंदे प्रोडक्शन्स निर्मित, निर्माती ज्योती देशपांडे, निर्माती सौ. बेला केदार शिंदे ,केदार शिंदे दिग्दर्शित "झापुक झुपूक" सिनेमा २५ एप्रिल पासून प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटकेदार शिंदे