Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राजा चित्रपटाद्वारे मिळणार सौरदीप कुमार, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे या नव्या चेहऱ्यांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 12:37 IST

प्रेम हा सिनेरसिकांइतकाच दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. यामुळेच प्रेमावर आधारलेल्या सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक असून अशा सिनेमांना प्रेक्षकांचीही ...

प्रेम हा सिनेरसिकांइतकाच दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. यामुळेच प्रेमावर आधारलेल्या सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक असून अशा सिनेमांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत असते. ‘राजा’ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ या सिनेमाची कथा सादर केली आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार या सिनेमात शीर्षक भूमिकेत असून, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे ‘राजा’द्वारे प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. येत्या २५ मे ला ‘राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.निर्माते प्रवीण काकड यांनी ‘सत्यसाई मल्टिमीडिया प्रा. लि.’ या संस्थेअंतर्गत ‘राजा’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शनासोबतच सिनेमाच्या लेखनाची जबाबदारीही शशिकांत देशपांडे यांनी सांभाळली आहे. ‘राजा’ या सिनेमाची कथा एका पॅाप सिंगरच्या जीवनावर आधारित आहे. नैसर्गिक आवाजाची सुरेल देणगी लाभलेल्या एका शेतकऱ्याच्या मुलाचा पॉप सिंगर बनण्याचा प्रवास या सिनेमात आहे. देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ची कथा सादर केली आहे. राजाच्या जीवनात येणाऱ्या दोन्ही नायिका त्याला त्याच्या प्रवासात यथोचित साथ देतात. यापैकी एक असते राधा, तर दुसरी मीरा. यानिमित्ताने जणू आधुनिक युगातील राधा-मीराची प्रेमकथाही समोर येणार आहे. गायक बनण्यासाठी स्ट्रगल करणारा राजा नेमका कोणावर प्रेम करत असतो? ते सिनेमा पाहिल्यावरच समजेल.उत्कंठावर्धक कथानक ही या सिनेमाची सर्वात मोठी जमेची बाजू असल्याचे दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांचे म्हणणे आहे. राजाच्या जीवनात येणारे चढ-उतार प्रेक्षकांना स्वत:च्या जीवनातील स्ट्रगलशी जोडण्यात यशस्वी होतील आणि हेच या सिनेमाचे सर्वात मोठं यश असेल असे देशपांडे यांचे म्हणणे आहे. या सिनेमात एका गायकाचा प्रवास असल्याने देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेला सुमधूर संगीताची जोड देत ‘राजा’चा प्रवास संगीतमय बनवला आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे याखेरीज शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, राजेश भोसले, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, मिलिंद इनामदार, पौरस आदी कलाकारांच्याही या सिनेमात भूमिका आहेत.Also Read : 'या' कारणामुळे बिग बॉसच्या घरामधून विनीत भोंडे झाला घराबाहेर !