Join us

Neha Pendse's Wedding : मराठमोळी ही अभिनेत्री उद्या चढणार बोहल्यावर, समोर आले मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 16:02 IST

Neha Pendse Wedding : सोशल मीडियावर या अभिनेत्रीच्या संगीत व मेहंदी सेरेमनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहे.

बिग बॉस १२ची स्पर्धक व मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. ती बिझनेसमॅन शार्दुल सिंग बयाससोबत लग्नबेडीत अडकणार आहे. तिच्या लग्नाच्या रितीरिवाजाला सुरूवात देखील झाले आहे. या रिवाजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नेहा व शार्दुल बऱ्याच वेळापासून एकमेकांना डेट करत आहेत आणि ५ जानेवारीला ते दोघं महाराष्ट्रीय पद्धतीनं विवाह बंधनात अडकणार आहेत. आता तिच्या लग्नाच्या आधीच्या विधी तिच्या सुरू झाल्या आहेत.

सोशल मीडियावर सध्या नेहा पेंडसेच्या मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

यामध्ये तिनं मल्टीकलर फ्लोरल प्रिंटचा लेहंगा परिधान केला होता. हा फोटो नेहाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती पती शार्दुलसोबत दिसत आहे. त्यानं सुद्धा नेहाला मॅचिंग पेहराव केला आहे. या फोटोमध्ये ही जोडी खूपच गोड दिसत आहे.

तसेच संगीतमध्ये नाचतानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पहायला मिळत आहे. या सेरेमनीमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नेहाचे मित्रमंडळीदेखील सहभागी झालेले पहायला मिळत आहेत. 

येत्या ५ जानेवारीला बॉयफ्रेंड शार्दुलसह लग्न करत नेहा आपल्या आयुष्याची नवीन सुरूवात करणार आहे. नेहाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लग्नापूर्वी केल्या जाणा-या गृहमुख पूजेची फोटो शेअर केली आहेत.

नेहा तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे.

नेहाने बालकलाकार म्हणून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. तिने अभिनयक्षेत्रात करियर करण्यामागे तिच्या आईचा मोठा हात होता.

केवळ १० वर्षांची असताना तिने सगळ्यात पहिल्यांदा कॅमेराला फेस केले होते. तिने बालकलाकार म्हणून अनेक चित्रपट, मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

टॅग्स :नेहा पेंडसेलग्न