Join us

भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 11:12 IST

भारत विरुद्ध पाक सामन्याच्या आधी नाना पाटेकर काय म्हणाले होते?

एशिया कप २०२५ भारत विरुद्ध पाकिस्तान सामना काल पार पडला. पहलगाम हल्ल्यानंतर या सामन्याला परवानगी दिलीच कशी असाच अनेकांचा सूर होता. ही मॅच बॉयकॉट करा अशीही मागणी झाली होती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानवर विविध प्रकारे बंदी आणली होती. पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावर अकाऊंटही भारतात बॅन केले होते. त्यांचे सिनेमेही भारतात रिलीज केले नाहीत. पण आता सामन्याला परवानगी मिळाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांना या विषयावर त्यांचं मत विचारलं असता ते काय म्हणाले वाचा.

नाना पाटेकर नुकतेच नाम फाऊंडेशनच्या पुणे येथील कार्यक्रमासाठी आले होते. तिथे त्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर मत विचारलं गेलं. तेव्हा ते म्हणाले, "खरं सांगायचं तर यावर मी यावर बोललंच नाही पाहिजे. तरी सुद्धा, माझं वैयक्तिक मत असंच आहे की भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये. जर माझ्या लोकांचं रक्त वाहिलं आहे तर आपण त्यांच्यासोबत का खेळायचं? सरतेशेवटी माझ्या हातात असलेल्या गोष्टींबद्दल मी बोलावं."

याआधी सुनील शेट्टीनेही सामन्यावर प्रतिक्रिया दिली होती. तो म्हणाला होता की, "हे एक वर्ल्ड स्पोर्ट ऑर्गनायझेशन आहे. त्यांना नियमांचं पालन करावं लागेल. यात इतर खेळांचाही समावेश आहे. हा पण एक भारतीय म्हणून हा सामना पाहायचा की नाही हे प्रत्येक जण आपापलं ठरवू शकतो. पण तुम्ही खेळाडूंना दोषी ठरवू शकत नाही."

टॅग्स :नाना पाटेकरमराठी अभिनेताभारतपाकिस्तानआशिया कप २०२५