Join us

Video: नम्रताचा लेक आणि भाचीचा 'नाच गं घुमा' गाण्यावर शेतात जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 16:04 IST

नम्रता संभेरावच्या लेकाने आईच्या नाच गं घुमा सिनेमातील गाण्यावर केलेला धम्माल डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय (naach ga ghuma)

सध्या 'नाच गं घुमा' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. 'नाच गं घुमा' सिनेमा नम्रता संभेराव आणि मुक्ता बर्वे या दोघींच्या अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळाली. सिनेमा रिलीज होऊन तीन आठवडे झाले तरीही हा सिनेमा थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. मुक्ता बर्वे नाटकाच्या दौऱ्यानिमित्त अमेरिकेत होती. पण ती सुद्धा आता भारतात परतली असून 'नाच गं घुमा' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच सिनेमातील आशाताई म्हणजेच नम्रताच्या लेकाने आईच्या सिनेमातील गाण्यावर धम्माल डान्स केलाय. 

नम्रताचा मुलगा रुद्राज आणि तिची भाची श्रीशा यांचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. रुद्राज आणि श्रीशा दोघेही मोकळ्या शेतात धम्माल डान्स करताना दिसत आहेत. दोघांच्या निरागस डान्स स्टेप तुमचं मन नक्कीच जिंकतील यात  शंका नाही. नम्रताने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शन लिहिलंय की, "प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात नाच गं घुमाचं तिसऱ्या आठवड्यात पदार्पण Rudraaj आणि भाची shreesha दोघांचा उत्साह आनंद टिपेला. मुक्ता बर्वे हे तुझ्यासाठी आणि तुला कारण माहितीय."

'नाच गं घुमा' चित्रपटाचे दिग्दर्शन परेश मोकाशी यांनी केले आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव,सारंग साठ्ये, सुकन्या मोने, सुप्रिया पाठारे, मायरा वायकुळ यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. तर स्वप्निल जोशी आणि शर्मिष्ठा राऊत यांनी 'नाच गं घुमा' सिनेमाच्या निर्मितीची बाजू सांभाळली आहे. सिनेमाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर १२ कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला आहे.

टॅग्स :नम्रता आवटे संभेरावमुक्ता बर्वेमराठीस्वप्निल जोशीपरेश मोकाशी