माझी माय मुंब्रादेवी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 13:25 IST
महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. यामुळे मराठी प्रेक्षक हे भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजन ऐकण्यात देखील रमलेला दिसतो. ...
माझी माय मुंब्रादेवी
महाराष्ट्राला संगीत आणि संगीतप्रेमींची फार मोठी परंपरा आहे. यामुळे मराठी प्रेक्षक हे भक्तीभावाने देवी-देवतांच्या भजन ऐकण्यात देखील रमलेला दिसतो. याच कारणामुळे महाराष्ट्राच्या घराघरात जशी चित्रपट आणि नाटकांची गाणी वाजतात तशीच भक्तीगीतंही मोठया श्रद्धेने ऐकली जातात. आता, भक्तीरसाने भरलेलं माझी माय मुंब्रादेवी हे गीत रसिकांच्या भेटीला लवकरच येत आहे. चंद्रछाया प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या माझी माय मुंब्रादेवी या गाण्यामध्ये मुंब्रादेवीची महती वर्णन करण्यात आली आहे. प्रवीणा समीर देसाई, सतिश चंद्रकांत देसाई, समीर चंद्रकांत देसाई यांनी तुज्या डोंगराची सावली आम्हावरी, माझी माय मुंब्रादेवी...या गीताची निर्मिती केली आहे. तरप्रविण कुंवर यांनी या गाण्याला संगीत दिले असून समीर चंद्रकांत देसाई यांनी गीत लेखन केले आहे. वैशाली सामंत आणि प्रविण कुंवर यांच्या सुमधुर आवाजात हे गाणं रेकार्ड करण्यात आले आहे. राजेंद्र पवार आणि प्रवीणा समीर देसाई यांनी या गाण्याचे व्हिडीओ दिग्दर्शन केले आहे.