Join us

भूतकाळ चित्रपटाचे म्युझिक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2016 13:14 IST

बॉलिवुड आणि हॉरर चित्रपटात मोठया प्रमाणात हॉरर चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. त्यातुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचे प्रमाण बोटांवर ...

बॉलिवुड आणि हॉरर चित्रपटात मोठया प्रमाणात हॉरर चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत असतात. त्यातुलनेत मराठी चित्रपटसृष्टीत हॉरर चित्रपटांचे प्रमाण बोटांवर मोजण्याइतकेच असतात. त्याचप्रमाणे कॉमेडी, रोमॅन्टिक चित्रपटांप्रमाणेच हॉरर चित्रपटांचादेखील आपला एक प्रेक्षकवर्ग आहे. त्यामुळे लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत लवकरच प्रेक्षकांना एक हॉरर असलेला मराठी चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे नाव भूतकाळ असे आहे. चित्रपटाच्या नावावरूनच प्रेक्षकांना अंदाज आला असणार आहे. याच चित्रपटाचे नुकतेच म्युझिक लॉन्च करण्यात आले आहे. हा म्युझिक लॉन्च सोहळा मोठया दिमाखात करण्यात आला आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना एक हटके जोडी पाहायला मिळणार आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि हेमांगी कवी ही जोडी भूतकाळ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल वाघमारे यांनी केले आहे. आजच्या तरूण पिढीला भावेल असे संगीत या चित्रपटात असणार आहे. या चित्रपटामध्ये संगीतकार सिद्धार्थ यांनी संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. तर मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना हिंदीतला गायक जावेद अली, गायिका बेला शेंडे आणि सिद्धार्थ शंकर महादेवन यांनी गायली आहेत. त्यामुळे या चित्रपटातील गाण्यांना चार चॉंद लागली आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत आणि रहस्याचा थरार असा संपूर्ण मनोरंजनाचा पॅकेज प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कोकणाच्या पार्श्वभूमीवरचा बा थरारकर हॉरर चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार आहे का हे पाहूयात. भूषणा आणि हेमांगी यांच्याव्यतिरिक्त या चित्रपटात शशिकांत गंधे, किरण नवलकर, संकेत लवंडे, नम्रता जाधव, अशोक पावडे, रमेश गायकवाड, स्वाती भाभूरवडे या कलाकारांचा समावेश आहे.