Join us  

'मुझे इश्क़ है...', प्राजक्ता माळीची पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 5:44 PM

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी(Prajakta Mali)ने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनेत्रीने मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये काम केले आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तसेच तिचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेत येत असतात. नुकतीच इंस्टाग्रामवरील तिची पोस्ट चर्चेत आली आहे.

प्राजक्ता माळी हिने इंस्टाग्रामवर साडीतले काही फोटो शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करत लिहिले की, मुझे इश्क़ है इश्क़ से … इस दर्द से इश्क़ है । प्राजक्ता माळीच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. एका चाहत्याने फोटोवर सुंदरा अशी कमेंट केली आहे. तर आणखी काही युजर्सनी सुंदर, छान अशा कमेंट केल्या आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळी हे नाव कायमच आघाडीवर असते. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीच्या काळात काही मालिकांत काम करून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. फक्त मालिकाच नव्हे तर मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याचंही स्वप्न तिनी पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. मालिका, चित्रपट, वेबसिरीज या तिन्ही माध्यमांमध्ये प्राजक्ता उत्तम काम करतेच, पण त्याबरोबरीनेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीही तिनी उत्तमरीत्या पेलली आहे. सुरुवातीपासूनच ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ह्या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. प्राजक्ताने अधिक मेहनत करत कलाविश्वात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता तिची ‘पोस्ट ऑफीस उघडं आहे’ या मालिकेत एन्ट्री झाली आहे. तब्बल ६ वर्षांनी तिने मालिकेत पुनरागमन केले आहे.

टॅग्स :प्राजक्ता माळी