Join us

एम.एस धोनी चित्रपटाचा ट्रेलर मराठीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 12:49 IST

सध्या प्रादेशिक भाषेंचे महत्व बॉलीवुडकरांना समजलेले दिसत आहे. यामुळे शाहरूखने त्याच्या फॅन चित्रपटाचे प्रमोशनल गाणे मराठीत केले होते. आता फॅन ...

सध्या प्रादेशिक भाषेंचे महत्व बॉलीवुडकरांना समजलेले दिसत आहे. यामुळे शाहरूखने त्याच्या फॅन चित्रपटाचे प्रमोशनल गाणे मराठीत केले होते. आता फॅन या चित्रपटानंतर एम.एस.धोनी या चित्रपटाचा ट्रेलर देखील मराठीत प्रदर्शित करण्यात येणार आहे. तसेच  तमिळ, तेलुगू भाषेत देखील प्रदर्शित करण्यात येणार आहे. धोनीचे चाहते देशभर आहेत. त्यामुळे त्यांच्या भाषेत या चित्रपटाची माहिती पोहोचावी यासाठी हे खास हे प्रयत्न केले जात आहेत. तमिळमध्ये ट्रेलर प्रदर्शित करण्याचा हेतू समजू शकतो. कारण नाही म्हटले तरी धोनीने आयपीएलमध्ये आठ वर्षे चेन्नई सुपरकिंग्ज टीमचे प्रतिनिधित्व केलेले आहे. मात्र मराठीत हा ट्रेलर प्रदर्शित करण्यामागचे प्रयोजन समजू शकलेले नाही.यानिमित्ताने पहिल्यांदाच एका मोठा हिंदी चित्रपटाचा ट्रेलर मराठीत प्रदर्शित होणार आहे.