झी स्टुडिओज प्रस्तुत, सागा निर्मित आणि गिरीश पांडुरंग कुलकर्णी दिग्दर्शित ‘जाऊंद्याना बाळासाहेब’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याविषयीची कमालीची उत्सुकता सिने रसिक आणि सिनेसृष्टीतील सर्व कलाकारांमध्ये निर्माण झाली आहे.
सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर विनोदी स्वरुपात भाष्य करण्यात आलेल्या या चित्रपटाचं टिझर मोशन पोस्टर नुकतंच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. अनोख्या वेशात आणि भलत्याच जोशात, झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्यांना जागं करायला येतोय ‘जाऊद्यांना बाळासाहेब’ असं वक्तव्य करत सोशल मिडीयावर या चित्रपटाचं टिझर मोशन पोस्टर तुफ्फान गाजणार यात काही शंका नाही.
दिग्दर्शनासह गिरीश कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिका पण साकारत आहेत. त्यांच्यासोबत अभिनेते मोहन जोशी, रिमा लागू, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभूणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशा अनुभवी कलाकारांची फौज चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजय-अतुल ह्या दिग्गज संगीतकारांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून ते या चित्रपटाच्या निमित्ताने निर्माते म्हणून पदार्पण करत आहेत.
'जाऊंद्याना बाळासाहेब’ ७ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.