Join us

स्वप्नीलच्या ओठी आईची महती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 13:16 IST

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक अढळ स्थान असतं. मात्र काही जण याच ...

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक अढळ स्थान असतं. मात्र काही जण याच आईला तिच्या म्हातारपणी वृद्धाश्रमात टाकतात. वृद्धाश्रमाच्या दाराशी पोटच्या लेकराची वाट पाहत बसते. हीच गोष्ट संगीतकार आणि गायक प्रवीण कुवर यांच्या मनाला खात होती. यातूनच 'माझी आई' या व्हिडीओ संकल्पनेचा उदय झाला आणि आईची महती सांगणारं गाणं समोर आलं. या गाण्याला प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर यानं स्वरसाज चढवलाय.नुकतंच या गाण्याचं रेकॉर्डिंग आजीवसन स्टुडिओत पार पडलं. विषय मनाच्या जवळचा असल्यानं कुणीही यांत प्रोफेशनल चार्जचाही विचार केला नाही. अंबरनाथ इथल्या कमला वृद्धाश्रमात या व्हिडीओचं शुटिंग करण्यात आलं. प्रविण कुवर प्रोडक्शननं हा व्हिडीओ तयार केलाय.