Join us
Daily Top 2Weekly Top 5

"मान्सून फुटबॉल"मध्ये प्रितम कागणे सागरिका घाटगे सोबत झळकणार !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 09:34 IST

मिलिंद उके यांच्या आगामी 'मान्सून फुटबॉल ' चित्रपटात "हलाल" फेम अभिनेत्री प्रितम कागणे आपल्या भेटीस येणार आहे.प्रितम कागणे हिने  ...

मिलिंद उके यांच्या आगामी 'मान्सून फुटबॉल ' चित्रपटात "हलाल" फेम अभिनेत्री प्रितम कागणे आपल्या भेटीस येणार आहे.प्रितम कागणे हिने  आतापर्यंत केलेल्या विविध भूमिका पाहून ती मराठी चित्रपटातील एक आश्वासक चेहरा ठरली आहे ,यात शंकाच नाही. प्रितमने 'हलाल ' या चित्रपटात अतिशय उत्तम भूमिका साकारली होती, प्रेक्षकांनी त्या भूमिकेत तिला स्विकारलं आणि तिचं कौतुक देखील केलं. प्रितम च्या चाहत्यांसाठी आता एक आनंदाची गोष्ट आहे, ती म्हणजे प्रितम आता मिलिंद उके यांच्या आगामी 'मान्सून फुटबॉल' या चित्रपटातून आपल्या भेटीस येणार आहे.या चित्रपटात सागरिका घाटगे ,विद्या माळवदे ,चित्राशी रावत आणि सीमा आझमी यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत ."मान्सून फुटबॉल"चित्रपटात या सर्व अभिनेत्री साडी नेसून आणि स्पोर्ट्स शूज घालून फुटबॉल खेळताना दिसणार आहेत. मध्यमवर्गीय गृहिणी या त्यांच्या नेहमीच्या जीवनशैलीतील गोष्टींना कंटाळलेल्या असतात आणि फुटबॉल ही त्यांची पॅशन असते. या सर्व महिला एकत्र येऊन त्यांच्या आयुष्यातील कंटाळवाणेपण कसे दूर करतात आणि फुटबॉल खेळण्याच्या जिद्दीला कशा पूर्णत्वाला नेतात याचे चित्रण या चित्रपटात आहे . 'मान्सून फुटबॉल ' हा स्त्रीप्रधान चित्रपट आहे. यातील प्रत्येक महिला जिद्दीच्या जोरावर आपली स्वप्न कशी पूर्ण करते हे या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रितम कांगणे या अभिनेत्रीने अनेक मराठी चित्रपटात वैविध्यपूर्ण आणि महत्वपूर्ण भूमिका केल्या आहेत.स्पोर्ट्स विषय केंद्रस्थानी असणारा हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट असून त्या भूमिकेकरिता ती आता सज्ज झाली आहे.