Join us

​ गौरव-श्रृतीचा मॉडर्न अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 12:56 IST

 अभिनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांचे काही खास फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल ...

 अभिनेत्री श्रृती मराठे आणि गौरव घाटणेकर नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांचे काही खास फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये गौरव आणि श्रृती दोघेही एकदम मस्त मॉडर्न लुकमध्ये पाहायला मिळत आहेत. पिंक कलरच्या गाऊनमध्ये श्रृती एकदमच झककास दिसत आहेत. हे फोटो या दोघांनीही लग्नाच्या आधी खआडले असल्याचे समजतेय. फोटोग्राफर हर्षद मुजूमदार यांनी या नवीन जोडीचे हे अविस्मरणीय क्षण कॅमेºयात कैद केले आहेत. 'राधा ही बावरी' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या श्रृतीचा ४ डिसेंबर रोजी विवाह झाला. झाली. अभिनेता गौरव घाटणेकरसोबत श्रुतीने सप्तपदी घेतल्या. श्रुतीने मराठीतील मालिका आणि सिनेमांसोबत दाक्षिणात्य सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी छाप सोडली आहे. श्रुती आणि गौरवची ओळख 'तुझी माझी लव्ह स्टोरी' या सिनेमाच्या सेटवर झाली होती. या सिनेमाच्या सेटवर दोघांचे सूत जुळले. तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. श्रुती आणि गौरवच्या लग्नाला मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अभिनेते नाना पाटेकरांसोबत बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि त्यांच्या पत्नी रत्ना यांनीही लग्नाला हजेरी लावून श्रुती-गौरवला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यासोबतच अभिजीत खांडकेकर, अमृता खानिवलकर, हेमांगी कवी, भार्गवी चिरमुले, संस्कृती बालगुडे, सोनाली खरे, नेहा पेंडसे यांच्यासह अनेक मराठी सेलिब्रिटींनी श्रुती-गौरवच्या लग्नाला आवर्जुन हजेरी लावली होती. श्रुतीच्या मेंदी सेरेमनीलासुद्धा संस्कृती बालगुडे आणि भार्गवी चिरमुले हजर होत्या. पाहा या क्युट कपलचे काही खास फोटो :-