Join us

यंटमचे मॉडर्न संगीतकार महेश-चिनार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 14:50 IST

आजवर एकाहून एक सुपरहिट गाण्यांमुळे संगीतकार चिनार महेश यांची ओळख आहे. टाइमपास या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते. या ...

आजवर एकाहून एक सुपरहिट गाण्यांमुळे संगीतकार चिनार महेश यांची ओळख आहे. टाइमपास या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले होते. या चित्रपटातील सगळीच गाणी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली होती. चित्रपटाच्या कथानकाला साजेशी आणि तरुणाईला आवडतील अशी गाणी चिनार महेश यांनी आजवर संगीतबद्ध केली आहेत. मात्र, यंटम या चित्रपटात ग्रामीण शब्द आणि मॉडर्न संगीत असा आगळा प्रयोग त्यांनी केला आहे. यंटमची गाणी सोशल मीडियात अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहेत. शार्दूल फिल्म्स अँड एन्टरटेन्मेंटच्या अमोल काळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, रवी जाधव फिल्म्सने या चित्रपटाची प्रस्तुती केली तर समीर आशा पाटीलने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. गीतकार मंगेश कांगणेने या चित्रपटातील गाणी लिहिली असून हर्षवर्धन वावरे, योगेश रणमले, आनंदी जोशी, छगन चौगुले यांनी ही गाणी गायली आहेत. हा चित्रपट उद्या संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.यंटमचे संगीत हा वेगळा प्रयोग ठरला आहे. चित्रपटाचे संगीत करताना त्याच्या कथेचा, त्यातल्या वातावरणाचा, भाषेचा विचार करावा लागतो. यंटमच्या कथानकात वेगळेपण आहे. हे कथानक संगीतप्रधान आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या संगीतात प्रयोग करण्याची आम्हाला संधी मिळाली. असे संगीत या पूर्वी कधी करायला मिळाले नव्हते. चित्रपटाचे कथानक ग्रामीण पार्श्वभूमीवरचे असले, तरी त्यातली भावना युनिर्व्हसल आहे. त्यामुळे गाणी ग्रामीण भाषेत आणि संगीत आजच्या मॉडर्न पद्धतीचे असा प्रयोग आम्ही केला आहे. या चित्रपटात प्रेमगीत, गोंधळ अशी वैविध्यपूर्ण गाणी आहेत. मधुकर धुमाळ आणि ओंकार धुमाळ या बाप-लेकाच्या सुमधुर सनईचा आस्वादही या चित्रपटात अनुभवता येणार आहे. आजच्या तरूणांना आवडेल, असा गाण्यांचा साऊंड आहे. चित्रपटाचे सगळे संगीत लाईव्ह पद्धतीने रेकॉर्ड करण्यात आले आहे. त्यामुळे ओरिजिनल साऊंड हे याचे वैशिष्ट्य आहे,' असे या चित्रपटाचे संगीतकार चिनार महेश सांगतात.यंटम या चित्रपटात टीनएज लव्हस्टोरी दाखवली जाणार आहे. मात्र त्या पलीकडे जाऊन आयुष्याबद्दल काहीतरी वेगळा दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. Also Read : ​फेसबुकवरून सापडला यंटमचा हिरो!