स्पृहा रमली शाळेच्या आठवणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 11:30 IST
सांग सांग भोलेनाथ शाळेला सुट्टी मिळेल का. प्रत्येकाचे बालपणीचे हे आवडते गाणे. मात्र बालपणी नको वाटत असलेली शाळा ही ...
स्पृहा रमली शाळेच्या आठवणीत
सांग सांग भोलेनाथ शाळेला सुट्टी मिळेल का. प्रत्येकाचे बालपणीचे हे आवडते गाणे. मात्र बालपणी नको वाटत असलेली शाळा ही मोठेपणी हवीहवीशी वाटत असते. पंधरा आॅगस्ट असो या सव्वीस जानेवारी शाळेची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. का आपण मोठे झालो हा प्रश्नदेखील मोठयापणी सतत सतावत असतो. हाच प्रश्न अभिनेत्री स्पृहा जोशीलादेखील सतावत असल्याचे पाहायला मिळत आहे. कारण नुकतीच स्पृहाने प्रमुख पाहुणी म्हणून शाळेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. ज्यावेळी स्पृहा शाळेत पोहोचली, त्यावेळी तिला शाळेच्या प्रत्येक खडानखडा आठवणीत ती रमली होती. असाच एक किस्सा तिने सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. ती आपल्या या पोस्टच्या माध्यमातून सांगते, परवा चेंबूरच्या 'आमची शाळा' मध्ये वॉर्ड लेव्हल विज्ञान प्रदर्शनाला प्रमुख पाहुणी म्हणून गेले होते. इतक्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्या.. बालमोहनमध्ये असताना दरवर्षी ही विज्ञान प्रदर्शनं, त्याबरोबरचे सहशालेय उपक्रम.. निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, समूहगीतगायन स्पर्धा.. सगळ्यांच्या तालमी, बुडवलेले तास, रात्ररात्र केलेली जागरण, हरण्यातली गंमत, जिंकण्यातला आनंद, शिक्षकांच्या चेहºयावरचं कौतुक... मला आम्ही केलेला पर्यावरणाचा एक आणि 'सिग्नलविरहित चौक' नावाचा प्रोजेक्ट अजूनही लक्षात आहे.. खडानखडा! नकळत किती गोष्टी रुजल्या मनात या सगळ्यामुळे.. वैज्ञानिक वगैरे झालो नाही आम्ही कोणी, पण रॅशनली विचार करायची सवय नक्की लागली असल्याचे स्पृहाने यावेळी सांगितले. तसेच तिने काही फोटोदेखील सोशल मीडियावर अपलोड केले आहेत. तिच्या या फोटोला प्रचंड लाइक्स व कमेंन्ट मिळताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर स्पृहाने यावेळी शाळेच्या आठवणीत रमण्याची संधी दिल्याबद्दल नंदू कदम सरांचे आभारदेखील मानले आहे. स्पृहाने पैसा पैसा, लॉस्ट अॅण्ड फाउड, बायस्कोप असे अनेक चित्रपट केले आहेत.