Join us

मेघना एरंडेनं सांगितला व्हॉइस ओव्हर क्षेत्रातला प्रसिद्ध आवाज बनण्याचा प्रवास, म्हणाली - तर ते इतके कठीण होतं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 14:13 IST

मेघना एरंडे (Meghana Erande) हिने कलाविश्वात डबिंग आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. ती फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नसून अभिनेत्रीदेखील आहे.

मेघना एरंडे (Meghana Erande) हिने कलाविश्वात डबिंग आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. ती फक्त व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नसून अभिनेत्रीदेखील आहे. मेघनाने आतापर्यंत अनेक कार्टून कॅरेक्टर्सला आवाज दिला आहे. तसेच तिने मालिकेतील आणि सिनेमातील पात्रांनाही आवाज दिलाय. 

मेघना एरंडे हिने नुकतेच आरपार ऑनलाइन या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यात तिने व्हॉइस आर्टिस्ट म्हणून तिच्या प्रवासाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, मला दोन स्टूलं घेऊन उभं केलं होतं. मला कारण मी माइक पर्यंत पोहोचतच नव्हते. असं एवढं मोठे स्टूल त्याच्यावर असं उभे केलेलं आणि हॅप्पी इनडिपेडन्स डे पापा असं आणि गंमत अशी असायची की ते रिलीज व्हायच्या आधी तुला डब करायला मिळतंय ना तुला आधी ते बघायला मिळतंय ना. तर ते एक कुठेतरी ना दॅट वॉज अ हाय इन काइंड ऑफ असं डेक्स्टॉर लॅब किंवा स्मॉल वंडर. 

''ते इतके कठीण होतं माझ्यासाठी की...''

पुढे ती म्हणाली की, स्मॉल वंडर आम्हाला स्पेशली शनिवार रविवारचा स्लॉट दिला होता की हॅरियेट सोप्पे कॅरेक्टर नव्हते. तिला ते फ्रिंज होती आणि मध्ये ना दात थोडासा गॅप होती. तिचे दात पडलेले आहेत बघ पहिले दोन सीझन. तर त्यांनी सांगितलं ती हवा गेलीच पाहिजे. तर ते बोलताना तो फ झाला पाहिजे. तर ते इतके कठीण होतं माझ्यासाठी की ते तिचा तो लिप्स पकडणं, तिचे ते लिप्सिंग करणं पण माझे दात आहेत ना तिचे नसले तरी तर ती मग तिथून ना त्या कॅरेक्टरच्या किती क्लोज जाता येईल मला ते सुरू झालं अशा काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी तिथे मिळायला लागल्या आणि मग मला तिथे व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून लीड मिळाली.