Join us  

माझी तुझी रेशीमगाठ: सेटवर मायराचं शुटींग टाइमटेबल कसं असतं माहितीये का?

By शर्वरी जोशी | Published: September 27, 2021 6:41 PM

Mazi tuzi reshimgath: मायराची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच मालिकेतून तिने तुफान यश मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा दिनक्रम कसा असतो किंवा तिच्या शुटींगचं शेड्युल कसं असतं हा प्रश्न अनेकांना पडतो.

ठळक मुद्देसव्वा चार वर्षांची मायरा तिच्या अभिनयासोबतच लाघवी बोलण्यामुळे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे

गेल्या काही काळात छोट्या पडद्यावरील अनेक बालकलाकार चर्चेत येत आहेत. उत्तम अभिनयशैली आणि चेहऱ्यावरील निरागस भाव यांमुळे हे  चिमुकले कलाकार प्रेक्षकांचं मन जिंकत आहेत. त्यातलंच एक नाव म्हणजे मायरा वायकुळ. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत मायरा, परी ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे अवघ्या सव्वा चार वर्षांची मायरा तिच्या अभिनयासोबतच लाघवी बोलण्यामुळे प्रेक्षकांच्या मनात ठाण मांडून बसली आहे. त्यामुळेच कमी कालावधीत मायरा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सोशल मीडिया सेन्सेशन ठरत असलेल्या मायराची ही पहिलीच मालिका असून पहिल्याच मालिकेतून तिने तुफान यश मिळवलं आहे. त्यामुळेच तिचा दिनक्रम कसा असतो किंवा तिच्या शुटींगचं शेड्युल कसं असतं हा प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडेच या प्रश्नाचा उलगडा आहे. त्यामुळे सेटवर गेल्यानंतर मायरा नेमकं काय करते हे समोर आलं आहे.

कोणत्याही मालिकेत किंवा चित्रपटात बालकलाकारांना घेतल्यानंतर त्यांच्या मूडनुसार, मनानुसार काम करावं लागतं. सहाजिकचं मायराच्या बाबतीतही तसंच होतं. मात्र, मायरा समंजस असल्यामुळे आम्हाला चित्रीकरण करताना फारसा वेळ लागत नाही, असं श्रेयस तळपदेने लोकमत ऑनलाइनला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 

श्रेयस तळपदेची रिअल लाईफ परी कोण माहितीये का? पाहा त्याच्या लेकीचे फोटो

"काही लहान मुलं खूप शांत किंवा लाजरीबुजरी असतात. त्यामुळे त्यांना इतरांसोबत जुळवून घ्यायला वेळ लागतो. तर काही मुलांची पटकन इतरांसोबत मैत्री होते. तसंच काहीसं मायराचं आहे. ती पटकन कोणासोबतही मिक्स होते आणि लगेच तिची मैत्री होते", असं श्रेयस म्हणाला.

माझी तुझी रेशीमगाठ: 'अपने पास बहोत पैसा है' म्हणत मायलेकीने केलं क्यूट फोटोशूट

पुढे तो म्हणतो, "मायरा सेटवर असली की वातावरण एकदम छान असतं. ती सकाळी आल्यावर प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणते आणि प्रेमाने सगळ्यांच्या गळ्यात पडते. त्यानंतर माझ्याशी किंवा प्रार्थनासोबत काही वेळ गप्पा मारते, मस्ती करते. आणि, मग तिचं आवरायला निघून जाते. कधी-कधी सहजंच काही तरी तिला सुचतं आणि मग सगळ्यांना म्हणते ,'आज माझं लवकर पॅकअप आहे..' मुळात तिला काहीच माहित नसतं की पॅकअप कधी होणार वगैरे पण ती आपली मस्त सगळ्यांसोबत मज्जा करत असते."

दरम्यान, मायराची ही पहिलीच मालिका आहे. मात्र, तिचा अभिनय आणि संवादाचं अचूक टायमिंग पाहिल्यावर  ही तिची पहिलीच मालिका असण्यावर अनेकांचा विश्वास बसत नाही. मायरा सेटवर तिच्या आई आणि वडिलांसोबत येते. मात्र, सेटवर आल्यानंतर ती प्रत्येकासोबत छान गप्पा मारते. त्यामुळेच सेटवरचं वातावरणही आनंदी असतं, असंही श्रेयसने सांगितलं. 

टॅग्स :टिव्ही कलाकारश्रेयस तळपदेसिनेमा