Join us

माझी तुझी रेशीमगाठ: यशची काकू झळकणार चित्रपटात; स्वाती पानसरेच्या पदरात नवा सिनेमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 19:44 IST

Swati Pansare: 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत स्वाती पानसरे यशच्या काकूची म्हणजेच मिथिलाची भूमिका साकारत आहे.

काही महिन्यांपूर्वीच छोट्या पडद्यावर माझी तुझी रेशीमगाठ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली.  या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे मुख्य भूमिका साकारत आहे. पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणाऱ्या या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडत असून अल्पावधीत ही जोडी लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे या दोघांव्यरितिक्त या मालिकेतील अन्य कलाकारही लोकप्रिय झाले. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे स्वाती पानसरे.

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत स्वाती पानसरे यशच्या काकूची म्हणजेच मिथिलाची भूमिका साकारत आहे. थोडीशी वेंधळट, नवऱ्याच्या प्रेम न मिळणारी मिथिला अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली मिथिला म्हणजेच स्वाती लवकरच आता एका चित्रपटात झळकणार आहे.

येत्या १३ मे रोजी 'आय एम सॉरी' हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेत्री स्वाती पानसरे महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्यामुळे स्वातीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. या चित्रपटात स्वातीसह अभिनेत्री समीरा गुजरदेखील स्क्रीन शेअर करणार आहे.

दरम्यान, माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या स्वातीने यापूर्वी अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेत ती झळकली आहे. इतकंच नाही तर, तब्बल १२ मराठी चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. ‘आप्पा आणि बाप्पा’, ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटांमध्ये झळकलेल्या स्वातीने तनिष्क, डॉय सोप, डिलाईट नट्स, केसरी टूर्स, HDFC होम लोन अशा काही जाहिरातीही तिने केल्या आहेत.

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा