Join us

'टकाटक 2'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड; पहिल्याच आठवड्यात केला कोटींचा बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 12:55 IST

Takatak 2: हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून मराठी कलाविश्वात आणि प्रेक्षकांमध्ये 'टकाटक 2'ची चर्चा सुरु होती. अखेर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रदर्शित होताच त्याने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

'टकाटक 2' हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकण्यास यशस्वी झाला असून त्याने पहिल्याच विकेंडला २.११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. १८ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी सिनेमागृहात गर्दी केली होती.  त्यामुळे हा चित्रपट यशस्वी ठरणार हे त्याच दिवशी निश्चित झालं.

दरम्यान, सध्या या चित्रपटाच्या कमाईमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. 'टकाटक 2' चं दिग्दर्शन मिलिंद कवडे यांनी केलं असून, संकल्पना-कथा-पटकथा लेखनही त्यांनीच केलं आहे. प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे हे कलाकार या चित्रपटात झळकले आहेत. 

टॅग्स :टकाटकसिनेमासेलिब्रिटीप्रथमेश परब