Join us

'दुसरा दरवाजा उघडण्याची ताकद...', केदार शिंदे यांची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:14 IST

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) यांच्या पोस्ट सोशल मीडिया क्षणात व्हायरल होतात.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते केदार शिंदे ( Kedar Shinde) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. 

केदार शिंदे यांनी स्वामींचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत ते लिहितात, स्वामी समर्थ महाराज की जय... काही निर्णय स्वामींवर सोपवून घ्यायचे. कारण एक दरवाजा बंद होतो, तेव्हाच दुसरा दरवाजा उघडण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. विश्वास हवा. त्यांच्यावर आहेच, स्वत:वर विश्वास हवा. त्यांच्या या पोस्टवर अमृता खानविलकरने लिहिले अगदी बरोबर अशी कमेंट केली आहे. अनेकांनी  यावर कमेंट केल्या आहेत. 

केदार शिंदे यांचा लवकरच  ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. शाहीर साबळे यांच्यावर जीवनावर आधारित या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे.चित्रपटात मराठमोळा अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari) शाहीर साबळेंची भूमिका साकारताना दिसणार आहे. केदार शिंदे या चित्रपटावर गेली अडीच वर्षं काम करत आहेत. जय जय महाराष्ट्र माझा, जेजुरीच्या खंडेराया, या गो दांड्यावरून ही शाहिरांची अजरामर गाणी चित्रपटात असणार आहेत.

टॅग्स :केदार शिंदे