Join us

मराठी चित्रपटांचा प्रेक्षक वाढणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 07:26 IST

मराठीमध्ये वेगवेगळे विषय मांडले जात आहेत. नवीन प्रयोग होत आहेत. बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते मराठीत येऊ इच्छित आहेत, हे ...

मराठीमध्ये वेगवेगळे विषय मांडले जात आहेत. नवीन प्रयोग होत आहेत. बॉलिवूडमधील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते मराठीत येऊ इच्छित आहेत, हे सगळं मान्य केलं तरी मराठी चित्रपटांना मिळणारी प्रेक्षकसंख्या ही एक मोठी समस्याच आहे. महाराष्ट्रात हिंदी भाषा बहुतेक करून सर्वांनाच समजते. त्यामुळे त्या भाषेतील चित्रपट पाहाण्यास पसंती देणारा प्रेक्षकवर्गही साहजिकच जास्त आहे.पण मराठी माणसानेच स्वत:हून आपल्या भाषेतील चित्रपटांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. हे होत नसल्याने मराठी प्रेक्षकच चित्रपटांमध्ये विभागला जात आहे. त्यामुळे मराठी प्रेक्षकवर्ग वाढत नाहीये. पण याऊलट महाराष्ट्रात राहणारे गुजराती, राजस्थानी, दाक्षिणात्य आदी लोकांनी मराठी चित्रपट पाहायला सुरुवात करण,हा मराठी चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग वाढवण्यासाठी अनेक पर्यायांपैकी एक पर्याय आहे.अभिनेता, लेखक, निर्माता अशा अनेक बिरूदावल्या असलेला मराठी आणि बॉलिवूड आणि त्याशिवाय तमीळ, बंगाली, तेलगू, इंग्लिश अशा विविध भाषांतील चित्रपटात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केलेला मराठमोळा कलाकार म्हणजे महेश मांजरेकर.संजय दत्त मुख्य भूमिकेत असलेला आणि मुंबईतील अंडरवर्ल्डवर भाष्य करणारा महेश मांजरेकर यांचे दिग्दर्शन असलेला पहिला चित्रपट म्हणजे वास्तव : दि रिअँलिटी. त्यानंतर अस्तित्त्व, कुरूक्षेत्र, हत्यार, रक्त, विरूध्द, मातीच्या चुली, शिक्षणाच्या आयचा घो, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, फक्त लढ म्हणा, काकस्पर्श, कुटुंब असे अनेक चित्रपटांना त्यांचे दिग्दर्शन लाभले.त्याबरोबरच वास्तव, कांटे, रन, प्लॅन, ओक्कादुन्नाडू, स्लमडॉग मिलेनियर, वॉंटेड, दबंग, रेडी, बॉडिगार्ड, ओह माय गॉड, शूट आऊट अँट वडाळा, सिंघम रिटर्न्‍स, जय हो आणि लवकरच प्रदर्शित होणारा बाजीराव मस्तानी अशा चित्रपटांमध्ये महेश मांजरेकर यांचा दमदार अभिनयही आपल्याला पाहायला मिळाला. मोठय़ा पडद्यावरील अभिनय आणि दिग्दर्शनासोबतच त्यांनी छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातही स्वत:ची वेगळी ओळख तयार केली. दिग्दर्शन, अभिनय, लेखक आणि निर्माता या चारही क्षेत्रात स्वत:चे 'अस्तित्त्व' सिद्ध केलेले महेश मांजरेकर 'सीएनएक्स सेलिब्रिटी रिपोर्टर' म्हणून आपले अनुभव शेअर करत आहेत.